Tarun Bharat

रत्न,आभूषण निर्यात 20 टक्क्यांनी वाढली

25,365 कोटीची निर्यात  : जीजेईपीसीची माहिती

मुंबई

Advertisements

अमेरिकेसह जगभरातील महत्वपूर्ण बाजारांमध्ये मजबूत मागणी राहिल्याच्या कारणास्तव रत्न व आभूषणांची निर्यात ही मे 2022 मध्ये वर्षाच्या आधारे तेजीत राहिली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ही वाढ साधारणपणे 20 टक्क्यांनी वधारुन 25,365.35 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषद (जीजेईपीसी) यांनी दिली आहे.

मे 2021 मध्ये रत्न व आभूषणांची एकूण निर्यात 21,156.10 कोटी रुपये होती. 2022 च्या एप्रिल व मे महिन्यात रत्न व आभूषणाची एकूण निव्वळ निर्यात ही 10.08 टक्क्यांनी वधारुन 51,050.53 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी 2021 मधील समान कालावधीत 46,376.57 कोटी रुपये होती.

जगाची वाढती पसंती

जागतिक दर्जाची रत्न व आभूषण निर्मिती करण्याच्यादृष्टीने भारताची कामगिरी स्पृहणीय ठरली असल्याचे जीजेईपीसीचे अध्यक्ष कोलिन शाह यांनी स्पष्ट केले.

कोरीव-पॉलीश हिऱयांची निर्यात तेजीत

कोरीव व पॉलिश करण्यात आलेल्या हिऱयांची निर्यात ही मे महिन्यात 10.04 टक्क्यांनी वाढून 16,156.03 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Related Stories

पारदर्शक स्मार्ट टीव्ही शाओमीकडून सादर

Patil_p

अमूलचे हळदी पाठोपाठ तुळशी-आलेयुक्त दूधही बाजारात

Patil_p

मागील सप्ताहात टॉपच्या कंपन्या नुकसानीत

Patil_p

सेन्सेक्सची 300 अंकांची घसरण

Patil_p

चढउताराच्या प्रवासानंतर बाजार बंद

Patil_p

पहिल्या दिवशी सेन्सेक्स 173 अंकांनी मजबूत

Patil_p
error: Content is protected !!