बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा आज शनिवार दि. १४ जानेवारी २०२३ रोजी बेळगाव खानापूर रोड येथील मराठा मंदीर येथे पार पडली. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रदिसाद मिळाला. सामान्यज्ञान, शिवकालीन इतिहास व संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमाप्रश्न या विषयावर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचा बुद्धयांक वाढावा व भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जात यावे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.
ही स्पर्धा सीमाभाग मर्यादित असून तीन विभागात घेण्यात आली.
१) प्राथमिक विभाग इयत्ता 7 वी पर्यंत,
२) माध्यमिक विभाग 8 वी ते 10 वी पर्यंत
३) महाविद्यालयीन विभाग इयत्ता ११ वी ते पदवीधर (वय वर्षे २३ पर्यंत)
विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आपले तर सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.