Tarun Bharat

चित्पावन ब्राह्मण संघाची सर्वसाधारण सभा

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

चित्पावन ब्राह्मण संघ बेळगावची 2021-22 वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी हिंदवाडी येथील आयएमईआरच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोविंद फडके होते. व्यासपीठावर कार्यवाह प्रकाश बापट, खजिनदार विवेक बापट उपस्थित होते. परशुराम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

अर्चना ताम्हणकर यांनी परशुराम गीत गायिले. 2022-27 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. नवनिर्वाचित पाच पदाधिकारी व आठ सदस्यांचा व्ही. एन. जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्ष गोविंद फडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मकरंद बापट यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. कार्यवाह प्रकाश बापट यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्त व अहवाल सादर केला. सहकार्यवाह अजित लेले यांनी देणगीदारांचे आभार मानले. खजिनदार विवेक बापट यांनी मागील वर्षाचा नफा-तोटा व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडले.

गुणी विद्यार्थ्यांचा गौरव

गुणी विद्यार्थी व माहेश्वरी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. लेखक, कवी दिवंगत अविनाश ओगले यांच्या ‘रंगमनाचे’ या काव्यसंग्रहाची निवड गुलबर्गा विद्यापीठाद्वारे अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने त्यांच्या पत्नी अश्विनी व मुलगा पुष्कर ओगले यांचा सत्कार करण्यात आला. पद्मश्री डॉ. मदन गोडबोले यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार झाला. त्यांच्या पत्नी उज्ज्वला गोडबोले या आदिवासी भागात पायाभूत काम करीत असल्याने त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. अनघा वैद्य-गोडसे यांनी केले. ज्योती वझे-बापट यांनी आभार मानले.

नाटय़रंग कार्यक्रम

दुसऱया सत्रात नाटय़गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नाटय़गीतांच्या विविध छटा असलेला नाटय़रंग हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भक्तीगीते, निसर्ग, प्रेम, विरह व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. मुकुंद गोरे, अर्चना ताम्हणकर, समीरा मोडक यांनी गीत सादर केले. विशाल मोडक, वैभव गाडगीळ, केतकी ताम्हणकर, नेहा ताम्हणकर यांनी संगीतसाथ दिली.

Related Stories

लोककल्प फौंडेशनतर्फे बेटणे येथे नेत्र तपासणी

Amit Kulkarni

प्राईड सहेलीतर्फे बाईक रॅली

Amit Kulkarni

बिम्स हॉस्पिटलला वैद्यकीय उपकरणांची मदत

Omkar B

येळ्ळूर-हलगा भागात आज वीजपुरवठा खंडित

Patil_p

व्हीव्हीपॅटअभावी निकालावर संशयाचे वावटळ

Amit Kulkarni

कणबर्गीतील जमीन पुन्हा घेण्याचा प्रयत्न

Omkar B
error: Content is protected !!