Tarun Bharat

…नाहीतर समांतर सभा घेणार- शौमिका महाडिकांचा इशारा

ऑनलाईन टीम, तरुण भारत

General Meeting of Gokul Dudh Sangh: कोरोनामुळे गेली दोन वर्ष गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा झाली नाही. यंदा मात्र प्रत्यक्ष सभा होत आहे. तसेच सत्ता बदलानंतर होणारी हि पहिलीच सभा असल्याने ती वादळी ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सभेत पाटील- महाडिक असा संघर्ष दिसणार आहे. आज होणाऱ्या सभेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. सत्ताधारी पक्षाचे सदस्य सकाळपासूनच ठाण मांडून आहेत.शौमिका महाडिक आणि विरोधक येण्याआधीच सभागृह भरल्याने विरोधकांना मागच्या खुर्चीवर बसावे लागले. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आजची सभा हि ६० वी सर्वसाधारण सभा आहे. महाडिक विरूध्द सतेज पाटील असा सामना आज होणार आहे.

यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या, सभागृह एवढं भरलचं कसं? अजून ठरावधारक आत यायचे आहेत. हे बसलेले नेमके कोण आहेत याची चौकशी व्हावी. तसेच जे ठरावधारक आहेत त्यांची बैठक व्यवस्था व्हावी अशी मागणी महाडिक यांनी यावेळी केली. तसेच समाधानकारक जर उत्तर नाही मिळाले तर समांतर सभा घेतली जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

सभागृहात होणाऱ्या घोषणाबाजीनंतर माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, सभासदांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली जाणार आहेत. सभा शांततेत पार पाडावी यासाठी शांत राहावे असे आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.

गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा सुरु होताच सभेत विरोधकाकडून नामंजूर च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे तणावपूर्ण वातावरणात सभेला सुरवात झाली. सुरवातीलाच अहवाल वाचन करण्यात आले. या वाचनानंतर हा अहवाल आम्हाला नामंजूर आहे अस म्हणत शौमिका महाडिक म्हणताच त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्त्यांनी ही नामंजूराची घोषणा दिली.

Related Stories

विद्युत तारेच्या धक्याने बापलेकांचा मृत्यू

Archana Banage

ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्याला फटकारले

Archana Banage

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार सरसंघचालक

Amit Kulkarni

आमच्या सभेला सात-आठ हजारांची गर्दी आणि शिवसेनेच्या शाखेसमोर…; नारायण राणेंचा टोला

Archana Banage

वळिवडेत किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

Archana Banage

…आणि तो युवा महोत्सव आर्याचा अखेरचा ठरला

Abhijeet Khandekar