वृत्तसंस्था/ मियामी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मंगळवारी इटलीच्या कॅमिला जॉर्जीने इस्टोनियाच्या कॅनेपीचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.
या सामन्यात जॉर्जीने कॅनेपीचा 7-6(7-4), 6-7(4-7), 7-6(7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात कॅनपीकडून 14 दुहेरी चुकांची नोंद झाली. हा सामना साडेतीन तास चालला होता. जॉर्जीचा पुढील फेरीत सामना बेलारुसच्या माजी टॉप सिडेड अझारेंकाशी होणार आहे. मियामी स्पर्धेतील अन्य सामन्यात बेल्जियमच्या मर्टन्सने अमेरिकेच्या पार्कसचा 6-1, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. कॅनडाची कोस्ट्युक, चीनची झियु, कॅनडाची मॅरीनो, आणि कॅथरेनी सिबोव्ह यांनीही पहिल्या फेरीतील आपले सामने जिंकले आहेत.