Tarun Bharat

4-जी ग्राहकांसाठी जिओची ऑफर

जिओफोन नेक्स्टवर 2000 ची सवलत मिळण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत राहिलेला रिलायन्स जिओचा फोन जिओफोन नेक्स्ट पुन्हा एकदा प्रसिद्ध होत असल्याचे संकेत आहेत. नेक्स्टवर जवळपास दोन हजार रुपयाची सवलत कंपनी देणार असून याकरीता ग्राहकांकडे जुना 4 जी फोन असणे आवश्यक आहे. तो जमा करुन हा लाभ मिळणार आहे. 

जिओफोन नेक्स्टची किमत 6,499 रुपये आहे, जी सवलत दरात 4,499 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ आणि गुगल यांनी एकत्रितपणे रिचर्स करुन हा कमी बजेटवाला स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

….यामध्ये विशेष फिचर्स

सदरच्या स्मार्टफोनमध्ये विशेष फिचर्स मिळणार आहेत. यामध्ये कॅमेऱयातच ट्रान्सलेशन फिचर आहे. ज्याच्या मदतीने कोणत्याही भाषेत टेक्स्टचा फोटो काढून त्याचे भाषांतर करुन ते वाचून ग्राहकाला ऐकताही येणार आहे. यात टाईपिंगची कटकट कमी होणार आहे. ओटीटी सपोर्ट असणाऱया पेनड्राईव्हचाही वापर करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Related Stories

नव्या क्रेडिट कार्डची संख्या घटली

Patil_p

इंटेल कॅपिटल 1894 कोटींची जिओमध्ये गुंतवणूक करणार

Patil_p

रिलायन्सकडून मनिष मल्होत्राच्या कंपनीत हिस्साखरेदी

Patil_p

सौदी अरबने तेलाच्या किमती घटविल्या

Patil_p

पोस्टाच्या सर्व बचत योजना ग्रामीण भागात होणार उपलब्ध

Patil_p

विना गॅरेंटीच्या कर्जासाठे 2.6 लाख प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!