Tarun Bharat

जर्मनीचे विरोधी पक्षनेते कीव्हच्या दौऱयावर

झेलेंस्कीसह अन्य वरिष्ठ अधिकाऱयांची घेतली भेट

जर्मनीतील विरोधी पक्षाचे नेते प्रेडरिक मर्ज यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यासह अन्य अनेक वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेण्यासाठी कीव्हचा दौरा केला आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांनी सध्या युक्रेनचा दौरा करणार नसल्याची भूमिका घेतली असताना मर्ज ही कीव्ह येथे पोहोचले.

युक्रेनकडून जर्मनीचे राष्ट्रपती प्रँक-वाल्टर स्टेनमीयर यांना आमंत्रित करण्यास नकार देण्यात आल्यावर शोल्ज यांचा युक्रेनियन अधिकाऱयांसोबत वाद झाला होता. स्टेनमीयर यांनी जर्मनीचे विदेशमंत्री असताना रशियासोबत जवळीक निर्माण केली होती, असा आरोप युक्रेनने केला आहे.

तुम्हाला मोठय़ा प्रमाणात सैन्य आणि वित्तीय मदत उपलब्ध करणाऱया देशाच्या राष्ट्रपतींना तुम्ही दौरा करू शकत नसल्याचे सांगता. हे आम्ही खपवून घेणार नसल्याचे शोल्ज यांनी युक्रेनला लक्ष्य करत म्हटले होते. तर शोल्ज यांच्याकडून दौऱयास नकार देण्यात आल्यावर बर्लिनमधील युक्रेनचे राजदूत आंद्रिज मेलनिक यांनी त्यांचे वर्तन शासन प्रमुखासारखे नसल्याची प्रतिक्रिया दिली.

हे काही किंडरगार्टनचे नव्हे तर युक्रेनवरील सर्वात क्रूर युद्धाचे प्रकरण आल्याचे मेलनिक यांनी म्हटले आहे. रशियाच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या विध्वंसाची पाहणी करण्यासाठी प्रेडरिक मर्ज यानी इरपिन शहराचा दौरा केला आहे. जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या युनियन ब्लॉकचे मर्ज हे नेतृत्व करत आहेत.

युद्धात नुकसानग्रस्त झालेल्या इरपिन शहराच्या पुनर्निर्मितीत मदत करणार असल्याचे मर्ज यांनी या दौऱयावेळी सांगितले आहे. मर्ज यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांच्याकडून युक्रेनच्या दौऱयावर नकार देण्यात आल्यावर निर्माण झालेल्या स्थितीचा लाभ घेण्यासाठी मर्ज युक्रेनमध्ये पोहोचल्याचे बोलले जात आहे. तर युद्ध सुरू झाल्यापासून जर्मनीने सुमारे 4 लाख शरणार्थींना आश्रय दिला आहे.

Related Stories

रशियात बाधितांची संख्या 44 लाखांवर

datta jadhav

महिलेच्या स्वरुपात राहतात पुरुष

Patil_p

माणुसकी व्यक्त करणारे छायाचित्र

Patil_p

कोरोनापेक्षा भयंकर विषाणूचा जगाला धोका

datta jadhav

अफगाणिस्तानला कोवॅक्सिनचे 10 लाख डोस

datta jadhav

कोरोनाच्या ‘म्यू’ व्हेरिएंटने वाढवली चिंता

datta jadhav