पूर्वी दिला होता नकार
रशियाच्या धमक्यांना धुडकावून लावत जर्मनीने युक्रेनला 50 गेपर्ड टँक पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. जर्मनीचे संरक्षण उद्योग फेब्रुवारीपासून हे रणगाडे युक्रेनला विकण्याचा प्रयत्न करत होता. परंतु स्कोल्ज यांच्या सरकारने याला मंजुरी दिली नव्हती. याचमुळे जर्मनीचे नागरिक सरकारवर टीका करत होते.
रशियाने युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविल्यास तिसऱया महायुद्धाची धमकी दिली आहे. या धमकीला न जुमानता जर्मनीने युक्रेनला विमानविरोधी रणगाडे पुरविण्याची घोषणा केली आहे. जर्मनीच्या संरक्षण मंत्री क्रिस्टीन लँबेच यांनी रैमस्टीन युएस एअर फोर्सच्या तळावर आंतरराष्ट्रीय संरक्षण अधिकाऱयांच्या एका बैठकीनंतर युक्रेनला गेपर्ड अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीम देण्याची घोषणा केली. अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीमसोबत आम्ही युक्रेनचे समर्थन करू. युक्रेनला सध्या जमिनीवरून हवाईक्षेत्र सुरक्षित करण्यासाठी याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
रशियाच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जर्मनी अशाप्रकारच्या अवजड शस्त्रास्त्रांनी युक्रेनला देण्यास तयार झाला आहे. 2010 मध्ये जर्मनीने गेपर्ड सिस्टीमला ऍक्टिव्ह डय़ुटीवरून हटविले होते. प्रारंभी जर्मनीने युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविण्यास विरोध करत केवळ मानवी मदत आणि वैद्यकीय उपकरणे देण्यास सहमती दर्शविली होती. जर्मनीच्या अनेक दशके जुन्या धोरणांच्या अंतर्गत तो संकट क्षेत्रात घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत नाही. रशियाने तिसऱया महायुद्धाची धमकी दिली असल्याने जर्मन संरक्षण मंत्र्यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वर्ण आहे.
युक्रेनमधील भीषण युद्धादरम्यान रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी जगात तिसऱया महायुद्धाचा धोका वास्तविक असल्याचा इशारा दिला आहे. युक्रेनसोबत शांतता चर्चा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की चांगले अभिनेते असून चर्चेचे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.