Tarun Bharat

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आगमन विजयाने

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील दुखापतीनंतर जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला आणि जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने सौदी अरेबियातील एका प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत विजयाने पुनरागमन केले.

फ्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत गेल्या जून महिन्यात उपांत्यफेरीच्या सामन्यात नदाल विरुद्ध खेळताना व्हेरेव्हला ही दुखापत झाली होती. त्याची धोंड शीर दुखावल्याने तो जवळपास सहा महिने टेनिस क्षेत्रापासून अलिप्त होता. 25 वषीय व्हेरेव्हने सौदी अरेबियातील या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला. या स्पर्धेतील झालेल्या सलामीच्या सामन्यात त्याने ऑस्ट्रियाच्या थिएमचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. त्यानंतर पुढील सामन्यात त्याला रशियाच्या मेदव्हेदेवकडून पराभव पत्करावा लागला. मेदव्हेदेवने हा सामना 6-4, 6-0 असा जिंकला.

Related Stories

प्रो कबड्डी लिग ः दोन्ही सामने टाय

Patil_p

आणखी एक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p

मध्यवर्ती करार श्रेणीत काईल जेमिसनची वर्णी

Patil_p

राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेत मजूर महिला गंभीर जखमी

Archana Banage

ऑस्ट्रियाचा थिएम पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

दीपक पुनियासह दोन मल्लांना कोरोनाची बाधा

Patil_p