Tarun Bharat

भाषेपेक्षा अधिक प्रभावी हाव-भाव

Advertisements

संशोधनात दावा : देहबाली संभाषणाला अधिक प्रभावी करू शकते

भाषा आणि हाव-भाव यांच्यात मोठा संबंध आहे. संभाषणाचा समोरच्या व्यक्तीवर कितपत प्रभाव पडणार हे हाव-भाव किंवा देहबोलीतून जाणून घेता येते. कमकुवत संभाषणालाही देहबोलीतून प्रभावी करता येते. देहबोली श्रोता आणि वक्ता यांच्यात सेतूसमान असून ती परस्परांना जोडून ठेवते असे उद्गार अमेरिकेच्या वेंडरबिट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या शेरिस क्ला यांनी काढले आहेत.

अल्झायमरच्या रुग्णांसाठी देहबोली अत्यंत उपयुक्त ठरते. आपले हात संभाषणाच्या तीव्रतेनुसार हलत असतात. कुणी दूरूनच आमचे म्हणणे न ऐकता हातांना पाहून जाणू शकतो की आम्ही शांत आहोत का रागात असे विधान संशोधक मेलिसा सी डफ यांनी केले आहे.

शिक्षक वर्गात शिकविताना देहबोलीचा खूबीने वापर करतात. भाषण देताना नेता देखील काही असेच करत असतो. भाषा शिकण्यापूर्वी मूल हावाभावातूनच स्वतःचे म्हणणे मांडत असतात. इशाऱयातून अनेकदा शब्दांनी व्यक्त न होणाऱया गोष्टी मांडता येतात. मूकबधीर लोकांच्या हावभावातून त्यांच्या मनातील गोष्ट जाणून घेता येते. जेव्हा आपण काही बोलत असतो, तेव्हा हातांसोबत डोळय़ातही ते भाव दिसून येत असतात.

बोलणारा सर्वसाधारणपणे स्वतःची देहबोली समजू शकत नाही. बोलताना आपण हातांचा कशाप्रकारे वापर करत आहोत हे त्याला माहित नसते. तर ऐकणाऱयावर त्याच्या देहबोली अन् हावभावांचा सर्वाधिक प्रभाव पडत असतो असे भाषातज्ञ तसेच मानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भाषा सहजपणे बदलता येते, परंतु देहबोली बदलणे अत्यंत अवघड असते. परंतु दीर्घकाळ सरावाने ती देखील बदलता येते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Related Stories

महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी : डॉ. कटारे      

prashant_c

गळाभेट घेत लाखोंची कमाई

Patil_p

संकष्टी चतुर्थीला मंदिराबाहेरुनच ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

Rohan_P

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रे आता पुस्तकरूपात!

Rohan_P

200, 500, 2000 रुपयांच्या नोटांनी सजावट

Patil_p

दाजीपूरचा जंगलवाचक शांताराम, वाचा जंगलातील कहाणी….

Rahul Gadkar
error: Content is protected !!