चिंचवड : शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली अश्विनी जगताप यांना एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आणणार, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे सर्व माजी नगरसवेक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच पोटनिवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आल्याचे मंत्री महाजन यांनी जाहीर केले.
अधिक वाचा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिका मॉनिटरची
अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. जगताप कुटुंबातील सर्वांशी त्यांनी संवाद साधून निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, संदीप खर्डेकर यांच्यासह पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.