सकल मराठाने जाहीर केली भूमिका
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव व सीमावर्ती भाग हा गेली अनेक वर्षे भाषिक संघर्ष करीत आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा, अशी भूमिका सकल मराठा समाजाने शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली.
सकल मराठा समाजातर्फे दि. 15 मे रोजी समाजहितासाठी, समाजाच्या एकत्रिकरणासाठी व मराठा समाजाचे गुरु प. पू. मंजुनाथ स्वामी यांचा तेरावे धर्मगुरु म्हणून अधिकारग्रहण समारंभ पार पडला. याचे औचित्य साधून सत्कार समारंभ आयेजित करण्यात आला आहे. शहाजीराजे यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी बेंगळूर येथे मराठा धर्मगादी निर्माण केली. या धर्मगादीची सर्वांना माहिती मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य प्रमाणात समाज एकवटणार असून ज्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून कार्यरत व्हायचे आहे, त्यांनी त्वरित मराठा समाजाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.