विदेशातील अमेरिकेत दूतावासात अपॉइंटमेंट घेता येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात अमेरिकन व्हिसासाठीचा बॅकलॉग कमी करण्याच्या प्रयत्नानंतरही अपॉइंटमेंटचा प्रतीक्षा कालावधी अद्याप 500 दिवसांहून अधिक आहे. विदेशात प्रवास करत असलेले भारतीय तेथील अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात व्हिसा अपॉइंटमेंट घेऊ शकतात असे भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने रविवारी जाहीर केले आहे. उदाहरणार्थ एखादा भारतीय सध्या थायलंडमध्ये असल्यास त्याला तेथील अमेरिकन दूतावासाकडून बी1 आणि बी2 व्हिसा (प्रवास आणि व्यवसाय)करता अपॉइंटमेंट घेऊ शकतो.
व्हिसा प्रक्रियेत होत असलेला विलंब कमी करण्यासाठी अमेरिकेने अलिकडेच नवा पुढाकार सुरू केला आहे. यात पहिल्यांदा व्हिसासाठी अर्ज करणाऱयांसाठी विशेष मुलाखती निश्चित करणे आणि कॉन्स्युलर स्टाफची संख्या वाढविणे सामील आहे. दिल्लीत अमेरिकन दूतावास आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासांनी देखील सुटीच्या दिवशीही व्हिसासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. अमेरिकेच्या विदेश विभागाने यापूर्वी कधी अमेरिकेचा व्हिसाप्राप्त अर्जदारांसाठी मुलाखतीपासून सूट देखील केली आहे.
भारतात अमेरिकेच्या दूतावासाने दोन आठवडय़ांपूर्वी 2 लाख 50 हजाराहून अधिक अतिरिक्त बी1/बी2 अपॉइंटमेंट्स जारी केल्या होत्या. अमेरिका भारतातील दीर्घ व्हिसा प्रतीक्षा कालावधी संपुष्टात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यात देशात कॉन्स्युलर अधिकाऱयांची एक तुकडी पाठविणे आणि जर्मनी, थायलंड यासारख्या देशांमधील अमेरिकन दूतावास देखील भारतीय व्हिसा अर्जधारकांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सामील आहे.