Tarun Bharat

इन्सुलीत तब्बल 2 कोटींचे ‘घबाड’

उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाची मोठी कारवाई : 1.87 कोटीची दारू पकडली

प्रतिनिधी /बांदा

गोवा बनावटीच्या दारूची गोवा ते मुंबई बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने इन्सुली येथे कारवाई केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूच्या तब्बल 1 लाख 44 हजार बाटल्या आढळल्या. यात 1 कोटी 87 लाख 20 हजार ऊपयांची दारू तर 25 लाखाचा कंटेनर व अन्य मुद्देमाल 12 हजार मिळून एकूण 2 कोटी 12 लाख 32 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला.

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती कुडाळ पथकाला होती. त्यानुसार गेले काही दिवस त्या वाहनावर करडी नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी इन्सुली तपासणी नाका येथे कंटेनर (एमएच-12/एलटी-7617) आला असता तपासणीसाठी थांबविला. तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे उघड झाले. त्याविषयी चालकाला विचारले असता आपणास माहिती नाही, असे त्याने सांगितले. सदर वाहन आपल्याकडे गोवा येथे पेट्रोल पंपावर दिल्याचे त्याने सांगितले. सदर वाहन घेऊन मुंबईत घेऊन येण्यास सांगितल्याचे त्याचे म्हणणे आहे. कारवाईत वाहनचालक राजशेखर सोमशेखर परगी (41, रा. माऊती सर्कल, नेकार नगर, ओल्ड हुबळी, ता. हुबळी जि. धारवाड कर्नाटक), रहमतुल्लाह कासीम खान (41, क्लिनर, रा. कल्लमानगू, यल्लापूर कारवार-कर्नाटक) यांना वाहनासह ताब्यात घेतले. गेली अनेक वर्षे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस दारूवर कारवाई करतात. मात्र, एवढी मोठी कारवाई प्रथमच करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे कुडाळचे निरीक्षक अमित पाडाळकर यांचे कौतुक होत आहे. त्यांना साथ देणाऱ्या सहकाऱ्यांनीही मोलाची कामगिरी बजावली.

ही कारवाई अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कुडाळ निरीक्षक अमित पाडळकर यांनी केली. कारवाईमध्ये निरीक्षक संजय मोहिते, तपासणी नाका, इन्सुली, दुय्यम निरीक्षक राहुल मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकुर, जवान-नि-वाहनचालक एच. आर. वस्त, जवान शरद साळुंखे व वाहनचालक संदीप कदम यांनी केली. अधिक तपास निरीक्षक अमित पाडाळकर करत आहेत.

Related Stories

आधुनिक ‘भगिरथ’… संजय पाटील!

Amit Kulkarni

केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक गोमेकॉतून घरी

Amit Kulkarni

उल्हास ज्वेलर्स तर्फे पणजीत डायमंड आणि पोल्की ज्वेलरी प्रदर्शन

Amit Kulkarni

भिरोंडा पंचायत क्षेत्रातील मड्डीवाडा, पिळयेकरवाडा गावात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई

Amit Kulkarni

कोरोनाच्या संशयितांमध्ये एक माजी मंत्री

tarunbharat

माशेल येथील रस्त्यावरील मासळीविक्रेत्यांचे स्थलांतर

Amit Kulkarni
error: Content is protected !!