वृत्तसंस्था/ चेन्नई
2022-23 इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी चेन्नईन एफसी फुटबॉल क्लबने घानाचा हुकमी फुटबॉलपटू वेमी कारीकेरीला करारबद्ध केले.
घानाच्या कारीकेरीने मागील फुटबॉल हंगामात थायलंड लीग फुटबॉल स्पर्धेत माझदा क्लबकडून खेळताना 29 सामन्यात 13 गोल नोंदविले होते. थायलंड एफए चषक फुटबॉल स्पर्धेत कारीकेरीने सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत संयुक्त दुसरे स्थान मिळविले होते. घानाच्या कारीकेरीने आपल्या 11 वर्षांच्या व्यवसायिक फुटबॉल कारकीर्दीत 261 सामने खेळले आहेत. चालू उन्हाळी मोसमात चेन्नईन एफसी संघाने हा तिसऱया विदेशी फुटबॉलपटूंशी करार आहे.