Tarun Bharat

जिह्यात होणार 510 घरकुलांची निर्मिती

गृहनिर्माणमंत्री सतेज पाटील यांची माहिती, 10 प्रकल्पांसाठी 31 कोटींचा खर्च

कोल्हापूर/प्रतिनधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 10 सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर झाले आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात 32 कोटी खर्चातून 510 घरकुलांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये नागरिकांना आपल्या हक्काचे घरकुल मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दिली येथे 30 मार्च (2022) रोजी झालेल्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत राज्यातील 232 सा†वस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील 10 प्रकल्पांचा सामवेश आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिह्यातील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 77, गडहिंग्लज नगरपालिका 40, इचलकरंजी नगरपा†लका 40, हुपरी नगर परिषद 40, मलकापूर नगरपा†लका 17, वडगाव नगरपरिषद 40, कागल नगरपलिका 63, मुरगूड नगरपालिका 103, जयसिंगपूर नगरपालिका 40, शिरोळ नगरपालिका 50 आदी ठिकाणी एकूण 510 घरकुलांची निर्मिती होणार आहे. या योजनेंतर्गत 300 चौरस फुटांच्या घराची निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख तर राज्य सरकारकडून 1 लाखाचे अर्थसहाय्य केले जाते.

‘सर्वांसाठी घरे 2022′ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने म्हाडा सुकाणू आभिकरण म्हणून कार्य करते. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक नागरी संस्था यांचे एकूण 232 सविस्तर प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय मूल्यमापन समिती आणि राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती व त्यानंतर केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीद्वारे मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

Related Stories

सातवे येथे मोटरसायकल-मोपेडच्या धडकेत एक ठार

Archana Banage

परतीच्या पावसाने हाहाकार; पिकांचं मोठं नुकसान

Archana Banage

जयसिंगपुरात पोलीस ठाण्यातूनच 185 मोबाईल लंपास

Archana Banage

भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुखांचा शिरोळमध्ये युवा संवाद व पदवीधर मतदार गाठीभेटी संपर्क दौरा

Archana Banage

पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर

Archana Banage

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठ वाहतूक कोंडीचे नियोजन करा

Archana Banage