Tarun Bharat

सोनसडय़ावर बायोमिथेनेशन प्रकल्प लादण्याचा घाट : शिरोडकर

प्रतिनिधी /मडगाव

मडगावातील एसजीपीडीए मार्केटमध्ये उभारलेला 5 टनांचा बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प हा अकार्यक्षम व तांत्रिकदृष्टय़ा सक्षम नसल्याचे ऑडिट अहवालात तज्ञ मंडळीनी स्पष्ट केलेले असताना सदर प्रकल्प उभारलेल्या पुणेस्थित कंपनीला सोनसडय़ावर 50 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट देण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक आमदार दिगंबर कामत यांचा यामागे हात आहे, असा दावा नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

एसजीपीडीए मार्केटमधील सदर बायोमिथेनेशन प्रकल्प बंद आहे. तसेच हे तंत्रज्ञान कालबाहय़ व तांत्रिकदृष्टय़ा सक्षम नसल्याचे शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ऑडिट अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर अहवाल मडगाव पालिकेला 22 जून रोजी सुपूर्द करण्यात आलेला आहे, तर पुणेस्थित ऊर्जा कंपनीने 30 जून रोजी सोनसडा येथे 50 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे, असे शिरोडकर यांनी नजरेस आणून दिले. सांखळीत असा बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे सदर कंपनीचे अधिकारी सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मडगावातील प्रकल्पाचा ऑडिट अहवाल पाहावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

5 टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प एसजीपीडीए मार्केट संकुलाबरोबर अन्य दोन ठिकाणी उभारण्यासाठी सदर कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. प्रत्येकी 2.5 कोटींचे हे प्रकल्प आहेत. एकून तीन प्रकल्पांचा खर्च 7.5 कोटी होईल व तो पाण्यात गेल्यात जमा होईल. ते झालेच, आता 50 टन क्षमतेचा जवळपास 30 ते 35 कोटींचा प्रकल्प सोनसडय़ावर उभारण्यासाठी सदर कंपनी प्रयत्न करत असून हा घोटाळा लक्षात न घेतल्यास जनतेच्या पैशांचे मोठे नुकसान होईल. सरकारने व खास करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी नगरसेवक शिरोडकर यांनी केली आहे. आपणही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या नजरेस आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

रोजगार हमीची माहिती तळागाळापर्यंत

Omkar B

सरकारी जावई नव्हे, जनतेचे मित्र बना!

Omkar B

गोवा निवडणूक : राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार

Archana Banage

यापुढे किनारपट्टी परिसरात बांधकामांना परवानगी नको

Amit Kulkarni

बार्देश मामलेदार विरोधात गुन्हा नोंद

Patil_p

वास्कोत सर्वधर्मीय शांती समिती निवडणार

Omkar B