कानूर/वार्ताहर
गेल्या २४ तासात घटप्रभा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रा बाहेर आली आहे. त्यामुळे पुर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे आज २४ तासात घटप्रभा प्रकल्पावर १४५ मिलिमीटर पाऊस झाला असून आज अखेर २२३४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
घटप्रभा प्रकल्पा खालील अडकूर कानडी तारेवाडी व हिंडगाव हे बंधारे सकाळीच पाण्याखाली आले होते तर सायंकाळी पाचच्या सुमारात भोगोली व पिळणी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत या वरून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. गेल्या आठ तासात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे घटप्रभ नदीचे पाणी यावर्षी प्रथमच पात्र बाहेर आले आहे त्यामुळे आज नदीकाठी ओढ्या काठी असणारी शिवार पाण्याने भरले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची रोप लागवड चालू होती त्यांच्या शेतात पाणी आल्यामुळे भातरोप लागवड कामे थांबली आहेत.
हे ही वाचा : भरपावसात विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले, आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार