Tarun Bharat

जायंट्स सहेलीच्या नूतन सदस्यांचे अधिकारग्रहण

प्रतिनिधी / बेळगाव

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच हिंद सोशल क्लबच्या सभागृहात पार पडला. यावेळी अध्यक्षा आर. पी. शहा, उपाध्यक्षा स्नेहल शहा, रश्मी पाटील, सचिव जिग्ना शहा, खजिनदार मोनाली शहा तसेच सदस्यांना अधिकार प्रदान करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्सच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन, फेडरेशन अध्यक्षा तारादेवी वाली, डॉ. सोनाली सरनोबत, जायंट्स परिवारचे राजू माळवदे, आनंद जांगळे, लगमान्ना दोडमनी व अनंत लाड उपस्थित होते.

यावेळी दिनकर अमीन यांनी जायंट्सच्या कार्याची माहिती देऊन सहेलीला शुभेच्छा दिल्या व या क्लबने पुरस्कार मिळवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. सोनाली सरनोबत यांनी निःस्वार्थीपणे समाजसेवा करण्याचा सल्ला दिला. तारादेवी वाली यांनी सहेलीने वंचितांसाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर दिनकर अमीन यांनी सदस्यांना, अनंत लाड यांनी संचालकांना व तारादेवी यांनी अध्यक्षा आरती शहा यांना सूत्रे प्रदान केली. आरती शहा यांनी वर्षभरातील उपक्रमांची माहिती देऊन जायंट्सने दाखविलेला विश्वास आपण सार्थ करू, असे सांगितले.

पाहुण्यांचा परिचय अनुक्रमे प्रियंका दोशी, निरुपमा शहा, रिया सिंग व मदालसा चौगुले यांनी करून दिला. सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले. जिग्ना शहा यांनी आभार मानले.

Related Stories

प्राचार्य फडके यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

Amit Kulkarni

व्हेगा चषक गोल्फ स्पर्धेत डॉ.दास्तीकोप विजेते

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारविरोधात अभाविप- भाजपचे आंदोलन

Patil_p

हयात प्रमाणपत्रांसाठी पोस्ट विभाग ठरतोय सोयीचा

Patil_p

सोशल क्लबवरील छाप्यात 8 जुगाऱयांना अटक

Amit Kulkarni

टपाल कर्मचाऱयांचा संप सुरू

Amit Kulkarni