प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या छत्तीस वर्षांपासून लोकसेवेचे व्रत घेऊन समाज जीवनात काम करणाऱया बेळगावच्या जायंट्स मेन या संघटनेला त्यांच्या सेवाकार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जायंट्सची आंतरराष्ट्रीय परिषद झाली नव्हती. यावषीची परिषद ही दमणसारख्या केंद्रशासित प्रदेशात झाली. तीन दिवस चाललेल्या परिषदेत जायंट्सच्या संघटनांनी कोणत्या पद्धतीने काम करावे, हे सांगून उत्कृष्ट काम केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि खासदार बाबूभाई पटेल होते. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शायना एन. सी. होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वैयक्तिक पातळीवर आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम उपाध्यक्ष म्हणून सुनील मुतगेकर यांना सलग दुसऱयांदा पुरस्कार मिळाला. फेडरेशन सचिव अनंत लाड यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्योती अनगोळकर यांनाही सलग दुसऱयांदा उत्कृष्ट माजी अध्यक्षा म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या तिघांचेही शायना एन. सी. यांनी जायंट्स मेनच्या कार्याचे कौतुक केले.