Tarun Bharat

जायंट्स प्राईड सहेलीने पूर्ण केले 25 उपक्रम

Advertisements

जायंट्स सप्ताहनिमित्त वेगळा आदर्श

प्रतिनिधी/ बेळगाव

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे जायंट्स सप्ताहनिमित्त 17 ते 23 सप्टेंबरदरम्यान एकूण 25 उपक्रम राबविण्यात आले. गरजूंना हवी असणारी मदत देऊन एक वेगळा आदर्श प्राईड सहेलीने घातला आहे.

समाजातील अधिकाधिक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात आला. उपक्रम पूर्ण करण्यासाठी अनेकांनी देणग्या दिल्या. या देणगीतून हे उपक्रम पूर्ण होऊ शकले. 17 रोजी या सप्ताहाला सुरुवात झाली. रूपाली जनाज यांच्या उपस्थितीत आरती शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम किल्ला येथील आराधना मतिमंद शाळेमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमधील गर्भवती महिलांना फळे व अल्पोपाहाराचे वितरण करण्यात आले. बुढापा घर येथे साडय़ा व फळे देण्यात आली.

18 रोजी नाथ पै सर्कल शहापूर येथे सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. जुने बेळगाव येथील बेघर 25 जणांना शर्ट व पॅन्ट पीस वितरित करण्यात आले. हलगा येथील गो-शाळेला भेट देऊन एक महिन्याच्या चाऱयाची व्यवस्था करण्यात आली. दि. 19 रोजी साई मंदिर टिळकवाडी येथील भाजी विपेत्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. मंडोळी रोड येथील साऊथ कोरियन कंपनीतर्फे सर्व सहेलींना प्रशिक्षण देऊन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थ्यांना स्टेशनरी व डेस वितरित करण्यात आले. दि. 20 रोजी सरस्वतीनगर व गणेशपूर येथील गरीब मुलांना वहय़ांचे वाटप करण्यात आले. सांबरा येथील विमानतळावरील अधिकाऱयांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कुडची येथील चन्नम्मा हिरेमठ या वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांच्यासोबत जेवण केले.

दि. 21 रोजी आराधना मतिमंद स्कूलमध्ये मुलांना बसण्यासाठी जमखान्याचे वितरण करण्यात आले. स्नेहालय स्पर्श येथील मुलांसाठी सराफ कॉलनी येथील गार्डनमध्ये वनभोजन आयोजित करण्यात आले होते. आर्ष विद्या केंद्रातील एका मुलीला एका महिन्यासाठी एका सहेलीने दत्तक घेतले असून, एक महिन्याचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. 22 रोजी गणेशोत्सव काळात 24 तास डय़ुटीवर असणाऱया पोलीस कर्मचाऱयांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गणेशपूर येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राला भेट देऊन फळांचे वाटप करण्यात आले. गणेशपूर येथील दिक्यांग मुलगी मनाली हिला प्रोटीन पावडर व फळे देण्यात आली. घरकाम करणाऱया बायकांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.

दि. 23 रोजी खानापूर तालुक्मयातील कारलगा येथे नियती फौंडेशन, प्राईड सहेली, नंदादीप नेत्रालय यांच्यावतीने मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. स्नेहालय ब्लाईंड फौंडेशन या संस्थेला धान्य वितरित करून सप्ताहाची सांगता करण्यात आली. निरोप समारंभाला अशोक पोतदार, डॉ. समीर पोटे, राजू माळवदे, अनंत जांगळे, अनंत लाड, प्रवीण त्रिवेदी, अध्यक्षा आरती शहा व्यासपीठावर उपस्थित होत्या. विमानतळावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले. उषा मेहता यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. स्नेहल शहा यांनी आभार मानले. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी महेंद्र सुर्वे, स्नेहालयचे शिवकुमार उपस्थित होते. सहेलीच्या रश्मी पाटील, निरुपमा शहा, पूजा पाटील, पवन राजपुरोहित, शीतल जाधव, भारती चंद्रगिरी, रिया सिंग, रूपा मंगावी, अश्विनी रोकडे, मधु नाईक, निला बडिगेर, रश्मी कदम, महालसा चौगुले आदी उपस्थित होते.

Related Stories

गणेश उत्सवाच्या खरेदीला लोकांची तुफान गर्दी

Nilkanth Sonar

चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघा जणांना अटक

Patil_p

कुर्ली येथे पाणी पुरवठा योजना कामास प्रारंभ

Omkar B

‘लोककल्प’तर्फे मोफत चष्मे वितरण

Patil_p

फिंगरप्रिंटवरून चोरी प्रकरणांचा छडा

Patil_p

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी उदय जाधव

Patil_p
error: Content is protected !!