प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे दि. 18 रोजी जायंट्स सप्ताहनिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धा मंगाई देवस्थान, अळवण गल्ली येथे पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून अळवण गल्लीतील देवस्थानचे पंच सूरज कुडुचकर व रवि हैबत्ती होते. विजेते पुढीलप्रमाणे…
पाक कला : (बेसनपासून तिखट-गोड पदार्थ) स्पेशल प्राईज- माधुरी सुंडीकर, 1) कविता पवार, 2) हर्षदा निलजकर, 3) रेणू काकतीकर. उत्तेजनार्थ वंदना मुचंडी, वैष्णवी काकतीकर.
मेंदी : 1) धनश्री कामती, 2) स्नेहल पारिश्वाड, 3) नम्रता मिरजकर, उत्तेजनार्थ वनश्री काकतीकर, महक व लक्ष्मी काकतीकर यांनी यश संपादन केले.
रांगोळी : (मुक्त हस्त)- 1) वैष्णवी काकतीकर, 2) परिणिता पाटील, 3) नम्रता निलजकर, (ठिपक्मयांची)- 1) प्राजक्ता पाटील, 2) माधवी सुंडीकर, 3) अक्षता मजुकर. उत्तेजनार्थ पल्लवी पवार, लावण्य सुंडीकर, वेदिका मुचंडी, सविता चंदगडकर यांनी यश संपादन केले आहे. निरीक्षक म्हणून रिया राजोळी, रिचल बिडीकर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी जायंट्स परिवारचे माजी फेडरेशन अध्यक्ष राजू माळवदे, माजी युनिट डायरेक्टर राम गंगाधर, प्रवीण त्रिवेदी, उपाध्यक्ष विजय खोत व समन्वयक प्रदीप हिरेमठ उपस्थित होते.