Tarun Bharat

लोककल्प फौंडेशनतर्फे गवाळी शाळेस संगणक भेट

प्रतिनिधी / बेळगाव

लोककल्प फौंडेशनने गवाळी गावात सीएसआर उपक्रम राबविला. गवाळी गाव खानापूर तालुक्मयाच्या जंगलात वसलेले आहे. सर्व प्रमुख शहरांशी त्याचा अत्यंत कमी संपर्क आहे. पावसाळ्यात या गावात रस्त्यांची दुरवस्था होते. येथे 7 वीपर्यंत शाळा आहे आणि उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कणकुंबी किंवा खानापूर येथे जावे लागते. परंतु खराब संपर्क रस्ते आणि वाहतुकीमुळे विद्यार्थी शाळेत जाणे बंद करतात.

लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली व लोककल्प फौंडेशनचे अध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या नेतृत्वाखाली गाव दत्तक उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक व सामाजिक कार्ये नियमित राबवून लोकमान्य सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. गवाळी येथील शिक्षक विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत ठेवण्यासाठी आणि त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत.

लोककल्प फौंडेशनने शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावित होऊन शाळेला दोन संगणक व प्रिंटर भेट दिले. मुलांनी आणि शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपकरणे वापरण्याचे वचन दिले. या कार्यक्रमासाठी लोककल्प फौंडेशनचे स्वयंसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Related Stories

शहराचे अर्थचक्र पुन्हा गतिमान

Amit Kulkarni

सकाळची बेंगळूर फेरी होणार पूर्ववत

Patil_p

किणयेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

Omkar B

हिडकल डॅम भूस्वाधीन कार्यालयावर छापा

Omkar B

लोकमान्यतर्फे ‘आनंदी जीवन’ गुंतवणूक योजना सादर

Omkar B

नियम मोडणाऱया आस्थापनांवर कारवाई

Amit Kulkarni