Gift of laptop, printer from Vaibhavwadi Rotary Club to Karivade School
कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाला लॅपटॉप व प्रिंटर भेट देण्यात आला . वैभववाडी येथील रोटरी क्लब च्या वतीने प्राध्यापक नामदेव गवळी यांच्या सहकार्याने देण्यात आला आहे सदर प्रिंटर व लॅपटॉप शाळेकडे सुपूर्त करण्यात आला आहे ही शाळा अनेक समस्या व अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहे 40 टक्के अनुदानावर ही शाळा कार्यरत आहे या शाळेत सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना चांगले सर्व सुविधायुक्त शिक्षण मिळावे यासाठी या गावचे रहिवासी आणि साहित्यिक वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव गवळी यांनी पुढाकार घेऊन वैभववाडी येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून या शाळेला लॅपटॉप व प्रिंटर भेट दिला आहे . यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष टक्के सचिव संजय रावराणे सदस्य मुकुंद राव राणे सचिन रावराणे प्राध्यापक नामदेव गवळी महेंद्र गवळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक देऊ साईल ज्येष्ठ शिक्षिका अर्चना सावंत एकनाथ जाधव प्रभाकर उ दार विष्णू परब श्रीमती जाधव आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी