Tarun Bharat

गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपवू शकतो पाकिस्तान

कर्जापासून मुक्तीसाठी पाऊल शक्य : भारत अन् अमेरिकेकडून होणार विरोध

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

Advertisements

चिनी कर्जाच्या भाराने घायकुतीला आलेल्या पाकिस्तानसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या कर्जापासून मुक्ती मिळविण्यासाठी पाकिस्तान आता अवैध कब्जा असलेला गिलगिट-बाल्टिस्तान भाग चीनला सोपवू शकतो. असे घडल्यास भारतासोबतचा त्याचा तणाव वाढणार आहे.

गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपवून पाकिस्तान कर्जापासून काही प्रमाणात दिलासा मिळवू शकतो. परंतु अमेरिकेची मोठी नाराजी ओढवून घेण्याची वेळ त्याच्यावर येणार आहे.  यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱया मदतनिधीप्रकरणी अडथळे निर्माण होऊ शकतात.

चीन सध्या दक्षिण आशियात स्वतःचे प्रभुत्व वाढविण्याची संधी शोधत आहे. चीनसाठी ही एक अत्यंत मोठी संधी ठरू शकते. कारण गिलगिट-बास्टिस्तानमधून चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर जातो. गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग आगामी काळात संघर्षाचे नवे ठिकाण ठरण्याची शक्यता आहे. परंतु हा भाग बळकावणे चीनसाठी सोपे नसणार आहे.

आंतरराष्ट्रीय विरोधासह गिलगिट-बाल्टिस्तानात राहणारे लोक देखील याच्या विरोधात रस्त्यांवर उतरू शकतात. पूर्वीच सीपीईसीवरून तेथील लोक नाराज आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान भागात पाक सरकारने यापूर्वीच स्थानिक प्रशासनाचे अधिकार कमी केले आहेत.

गिलगिट-बाल्टिस्तानात रोजगार, वीज, शिक्षण यासारख्या आवश्यक सेवा न मिळाल्याने लोक त्रस्त आहेत. पाकिस्तानातील एकूण 9 टक्के आत्महत्या याच भागात होतात. तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यावर चीनला गिलगिट-बाल्टिस्तानवर कब्जा करू देण्याच्या स्थितीत अमेरिका नाही.

Related Stories

रशियाकडून क्लस्टर बॉम्बचा वापर

Patil_p

3 पोलीस कर्मचाऱयांची फ्रान्समध्ये हत्या, चौथा गंभीर

Omkar B

फिलिपाईन्समध्ये चक्रीवादळाचे थैमान; 100 जणांचा मृत्यू

datta jadhav

ओझोनचा थर येतोय पूर्वपदावर; संशोधकांचा दावा

prashant_c

कमला हॅरिस यांनी घेतली लस

Omkar B

अमेरिकेवरही मात करणारा तालिबान

Patil_p
error: Content is protected !!