प्रशांत, संयुक्ता, वेदम, श्रीकारा विविध गटात यशस्वी : खुल्या गटात गिरीश बाचीकर चॅम्पियन
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित गंगाधरय्या सालिमठ स्मृती चषक बेळगाव जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गिरीश बाचीकर, प्रकाश कुलकर्णी, संयुक्ता साजण्णावर, वेदम चिक्कमठ, शिवनागराज ऐहोळी, श्रीकारा दर्बा यांनी विजेतेपद पटकाविले.
आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विविध गटातील बुद्धिबळ स्पर्धेत 283 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. निकाल पुढीलप्रमाणे. खुला गट- गिरीश बाचीकर 8.5 गुणासह प्रथम, श्रेयस कुलकर्णी 8 गुणासह द्वितीय, आकाश माडिवालर 8 गुणासह तृतीय, दासरी दत्तात्रेय राव 7.5 गुणासह चौथा, राहुल कांबळे 7 गुण पाचवा, आदित्य शेट्टी 7 गुण सहावा, मनोज हडपद 7 गुण सातवा, राशी अहमदखान 7 गुण आठवा, प्रवीण वालावलकर नववा तर साहील भटने दहावा क्रामंक पटकाविला.
आठ वर्षाखालील गट- वेदम चिकमठ 5.5 गुण प्रथम, सारा कागवाड द्वितीय, तन्मय पावले तृतीय, एस. एम. परीक्षित चौथा, वेदांत ताबाज पाचवा, सिद्धांत ताबाज सहावा, विपुल गौडा सातवा, अमोघ मरूर आठवा, दिवनेश टी. नववा, विराज कल्याणशेट्टी दहावा क्रमांक पटकाविला.
12 वर्षाखालील गट- शिवनागराज ऐहोळी 6.5 गुण प्रथम, राजेश धाली द्वितीय, अनिरूद्ध दासरी दत्तात्रेय राव तृतीय, रितेश मुचंडीकर चौथा, नील मंगनायक पाचवा, वैष्णवी व्ही. सहावी, गीतेश सागेकर सातवा, शौनकर पाटील आठवा, अद्वय मन्नोळकर नववा, अद्वैत भट दहावा क्रमांक पटकाविला.
16 वर्षाखालील गट-श्रीकारा दर्बा 8 गुण प्रथम, साईप्रसाद कोकाटे द्वितीय, साई मंगनायक तिसरा, गगन मुतगी चौथा, निधी कदम पाचवी, प्रणव आनंदाचे सहावा, पीयूष गायकवाड सातवा, निश्चल सखदेव आठवा, अतुल्या नववी, हर्ष कुलकर्णी दहावा क्रमांक पटकाविला.
उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू 55 वर्षावरील गट-प्रकाश कुलकर्णी 7 गुण प्रथम, वेंकटेशन कुलकर्णी द्वितीय. उत्कृष्ट महिला खेळाडू (16 वर्षावरील)-संयुक्ता साजण्णावर 7 गुण प्रथम, नेहा पाटील 5.5 गुण द्वितीय, रचना अनगोळकर 5 गुण तृतीय क्रमांक पटकाविला.
प्रोत्साहनपर विशेष पारितोषिक-अथर्व मुंगरवाडी प्रथम, राजवीर बाचीकर द्वितीय, प्रज्वल नेर्लेकर (अंध) तृतीय यांनी पटकाविले.
प्रमुख पाहुणे सालीमठ कुटुंब, बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संस्थापक सदस्य प्रकाश कुलकर्णी, बीडीसीएचे अध्यक्ष निलेश भंडारी, उपाध्यक्ष डी.डी. राव, सचिव गिरीष बाचीकर, किरण परिट यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, पदके व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक कदम, नित्यानंद दर्बा, पवन सालगार, सक्षम जाधव, स्वरूप राव यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत दहा अंध खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये दोघांनी बक्षीस पटकाविले. 5 वषीय राजवीर बाचीकर या स्पर्धेतील सर्वात कमी वयाच्या खेळाडूने चमक दाखविल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला.