माझा धर्म पशु बचाव संघटनेची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
प्राण्यांसाठी ब्लडबॅग उपलब्ध करून देण्याची मागणी काकती येथील हा माझा धर्म पशु बचाव या संघटनेने जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. अलिकडेच ब्लडबॅग उपलब्ध नसल्याने प्रयत्नांची शर्थ करूनही माझा धर्मच्या कार्यकर्त्यांना एका कुत्र्याला वाचविण्यामध्ये अपयश आले. त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन कुत्र्यावर उपचार करण्यासाठी धडपड केली. परंतु ब्लडबॅग नसल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला.
ही बाब लक्षात घेऊन संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांनी जिल्हा पशुवैद्यकीय सेवा खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांना निवेदन दिले. त्यांनी हे निवेदन स्वीकारून काही दिवसांत आपल्या वरि÷ांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.