Tarun Bharat

बिजगर्णी ग्रा.पं.ला विशेष अनुदान द्या : ग्रा.पं. सदस्यांची मागणी

Advertisements

वार्ताहर /किणये

बिजगर्णी ग्राम पंचायतीला विशेष अनुदान देण्याची मागणी ग्राम पंचायतीच्यावतीने जिल्हा पंचायतीकडे करण्यात आली आहे. सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. दर्शन यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे.

बिजगर्णी, कावळेवाडी, यळेबैल, राकसकोप या गावांचा बिजगर्णी ग्राम पंचायतीमध्ये समावेश आहे. सध्या ग्राम पंचायतीला मिळणारा निधी अपुरा पडत आहे. तसेच बिजगर्णी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गावांमधील गटारींची समस्या गंभीर बनली आहे. गटारी तुंबलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी गटारी बांधलेल्या नाहीत. या सर्व गटारींचे कामकाज करण्याची गरज आहे.

तसेच गावांमधील व शेतशिवारातील रस्ते, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विशेष अनुदानाची आवश्यकता आहे. पुढील वषी बिजगर्णी व कावळेवाडी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रेच्या आधी सर्व रस्ते, गटारी यांची सोय करणे आवश्यक आहे. बिजगर्णी ग्राम पंचायतीमधील निधी अपुरा पडत असून जि. पं.वतीने बिजगर्णी ग्राम पंचायतीला विशेष अनुदान मंजूर करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, उपाध्यक्षा पूजा सुतार, सदस्य ऍड. नामदेव मोरे, महेश पाटील, बबलू नावगेकर, अप्पू कांबळे, संदीप अष्टेकर, गायत्री सुतार, मनोहर पाटील, मोनेश्री सुतार, पवन बेळगावकर आदी उपस्थित होते.

Related Stories

खानापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड

Patil_p

पोलीस अधिकाऱ्यांची रिक्षा चालकांशी संवाद

Amit Kulkarni

उड्डाणपुलाशेजारील रस्ते समस्यांच्या गर्तेत

Amit Kulkarni

अतिरिक्त रेशनचा पुरवठा मार्चपर्यंत

Patil_p

ग्रामीण भागातील सरकारी शाळांना ग्रीनबोर्ड

Amit Kulkarni

‘बुडा’च्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!