मुंबईः
हवाई उद्योगातील नवी कंपनी अकासा एअरलाईन्सच्या विमानसेवेला उशीर होणार असल्याचे संकेत आहेत. त्यांची विमानसेवा जुलैमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत.सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची कंपनी अकासा एअरच्या ताफ्यात अद्यापही विमाने दाखल झालेली नाहीत. सदरची विमाने याच महिन्यात मिळायची होती. पण ती आता जूनमध्ये मिळणार असणार असल्याची माहिती आहे. परिणामी प्रत्यक्ष विमानसेवा ही जुलैमध्ये सुरू होईल, अशी शक्मयता वर्तविली जात आहे.