सेन्सेक्समध्ये 390 अंकांची घट, सन फार्मा समभाग तेजीत
वृत्तसंस्था /मुंबई
जागतिक बाजारातील अस्थिरता कायम असून सोबत विदेशी गुंतवणुकीचा कमी झालेला ओघ यामुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाला होता. यात सन फार्मा, कोल इंडिया यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 390अंकांनी घसरुन 57,235 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 109 अंकांच्या घसरणीसह 17014 अंकांवर बंद झाल्याचे दिसून आले. एकावेळी बाजारात सेन्सेक्स दीडशे अंकांनी खाली येत 16950 अंकापर्यंत घसरला होता. तर सेन्सेक्सही 500 अंकांनी घसरुन 57056 अंकांवर घसरलेला होता. एकंदरीत बाजारामध्ये चढउताराचे सत्र दिसून आले. निफ्टी निर्देशांकात धातू आणि आरोग्यशी निगडीत निर्देशांक तेजीमध्ये होते तर बँक आणि आयटी निर्देशांक मात्र 0.5 टक्के घसरणीत होते. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्का इतका घसरला होता. एचसीएल टेक्नॉलॉजीचा समभाग 4 टक्के इतका वाढला होता तर दुसरीकडे विप्रोचा समभाग मात्र या उलट 6 टक्के घसरताना दिसला. अदानी पोर्टस, एसबीआय,एसबीआय लाइफ इन्शु. यांचे समभाग घसरणीत आघाडीवर होते. तर एचसीएल टेक, सन फार्मा, कोल इंडिया, ब्रिटानिया व टाटा मोटर्स यांचे समभाग चांगली तेजी राखत बंद झाले होते. इंडियन हॉटेल्स, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, एल ऍँड टी फायनान्स या कंपन्यांचे समभाग घसरणीत होते. इंडिया सिमेंटस्, इंडियन हॉटेल्स यांचे समभागही घसरणीत होते.
जागतिक बाजारांमध्ये पाहता गुरुवारी अमेरिकेतील बाजारांमध्ये घसरण होती. युरोपियन बाजारात मात्र तेजी होती. आशियाई बाजारामध्ये नकारात्मक कल दिसून आला. निक्की निर्देशांक 159 अंकांनी घसरलेला होता. तर यासोबत हँगसेंग 311 अंक, कोस्पी 39 अंक तर शांघाई कम्पोझीट 9 अंकांनी घसरुन बंद झाला होता. विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 542.36 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.31 टक्के वाढत 92.74 प्रति बॅरलवर पोहचले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एचसीएल टेक….. 982
- सनफार्मा……….. 968
- कोल इंडिया…….. 234
- टाटा मोटर्स…….. 399
- ब्रिटानिया…….. 3784
- ग्रेसीम…………. 1679
- आयशर मोटर्स… 3471
- हिंडाल्को………… 401
- डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4254
- रिलायन्स……… 2382
- अदानी एंटरप्रायझेस 3233
- नेस्ले………….. 18763
- टीसीएस………. 3103
- अल्ट्राटेक सिमेंट. 6181
- महिंद्रा अँड महिंद्रा 1248
समभाग घसरलेल्या कंपन्या
- विप्रो…………….. 379
- अदानी पोर्टस्…… 784
- एसबीआय………. 521
- एसबीआय इन्शु. 1187
- लार्सन टुब्रो……. 1876
- आयसीआयसीआय 853
- युपीएल…………. 663
- एशियन पेंटस्…. 3209
- एचडीएफसी बँक 1393
- ओएनजीसी…….. 129
- एचडीएफसी लाईफ 520
- बजाज फायनान्स 7151
- एचयुएल………. 2566
- टायटन………… 2598
- भारती एअरटेल… 768
- ऍक्सीस बँक…….. 802
- एचडीएफसी….. 2283
- बजाज फिनसर्व्ह 1681
- पॉवरग्रीड कॉर्प…. 213
- बीपीसीएल…….. 300
- इन्फोसिस…….. 1419
- बजाज ऑटो…… 3604
- अपोलो हॉस्पिटल 4266
- कोटक महिंद्रा…. 1801
- टाटा स्टील……… 100
- आयटीसी 328