Tarun Bharat

खानापूर ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात विद्यार्थिनींचा गौरव सोहळा

Advertisements

प्रतिनिधी /खानापूर

जिद्द व चिकाटी ही यशाची खरी पायरी असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून अभ्यासूवृत्ती जपल्यास कोणत्याही विषयात यश मिळते. यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव हा अभिनंदनीय असल्याचे उच्चार मराठा मंडळ संचलित खानापूर ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित विद्यार्थिनींच्या गौरव सोहळय़ात बोलताना प्राचार्य एन. ए. पाटील यांनी व्यक्त केले.

 प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्राध्यापक सनदी यांनी करुन विद्यार्थिनींच्या गुणात्मक टक्केवारीचा आढावा मांडला. यावषी कॉलेजचा निकाल 65 टक्के लागला असून कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी ठाकर या विद्यार्थिनीने 92.16 टक्के गुण घेऊन तालुक्मयात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सेजल अंधरी, शिवानी पवार, रविना महेंद्रकर, अमिना सनदी, माधवी चौगुले, रेणुका येळ्ळूरकर, सुनिता लंबोर, कीर्ती पूजेर, सविता पुजेर, सलोनी गुरव, सुरेखा गुंडपीकर, फातिमा मुल्ला, रुबिया बेपारी, नाझिया बेपारी, श्रद्धा कुंभार, योगिता चौगुले, रेश्मा पाटील आदी विद्यार्थिनी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन कॉलेजच्या शिरात मानाचा तुरा खोवला आहे. तर रुबिया बेपारी या विद्यार्थिनीने समाजशास्त्रमध्ये पैकीच्या पैकी तर अमिना सनदी हिने अकाऊंटन्सीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेचे संचालक परशराम गुरव,  शिवाजीराव पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव सर्व प्राध्यापक, पालक उपस्थित होते.

Related Stories

नव्या वर्षात 3 अंगारकी संकष्ट चतुर्थी

Patil_p

स्मार्टसिटी अधिकाऱयाच्या घरात 23 लाखाचे घबाड

Omkar B

रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान बेळगावात

Omkar B

विजया ऑर्थोमध्ये तुटलेल्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

घर पडझडीच्या नुकसान भरपाईत कपात

Patil_p

मंडोळी रोडवरील पाणी गळती काढणार कोण ?

Amit Kulkarni
error: Content is protected !!