बेळगाव : बेंगळूर येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपदक पटकाविले, त्यात शिवाजी हायस्कूल कडोलीच्या खो खो पटूंचा समावेश आहे. या यशाबद्दल त्यांचा विद्यालयातर्फे खास सत्कार करण्यात आला.
शिवाजी हायस्कूल कडोलीच्या खेळाडू सायली कुटे, वैदेही पाटील, वेदिका कार्लेकर, समीक्षा शहापूरकर, तृप्ती मायाण्णा या पाच खेळाडूंचा या संघात समावेश होता. त्यांनी या स्पर्धेत सुरेख कामगिरी करून संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. याची दखल घेऊन शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी या खेळाडूंचा खास सत्कार केला.