प्रतिनिधी /बेळगाव
दहावीच्या परीक्षेत जिल्हय़ातील दहा विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळविले आहेत. या गुणी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात सत्कार केला व त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारली.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 6 व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील 4 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, वेगवेगळय़ा शाळांतून आलेले शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आदींच्या उपस्थितीत सत्काराचा हा सोहळा झाला. टिळकवाडी येथील हेरवाडकर हायस्कूलचा अमोघ कौशिक, केएलएस इंग्रजी मीडियमचा वेंकटेश डोंगरे, नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा मेमोरियल निवासी शाळेची स्वाती तोलगी, रामदुर्ग येथील केमरीज इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी आदर्श हालभावी, रामदुर्ग, लक्ष्मीनगर येथील बसवेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलची रोहिणी गौडर, सौंदत्ती तालुक्मयातील सत्तीगेरी येथे असलेल्या कर्नाटक पब्लिक स्कूलच्या सहना रायर यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील हारुगेरी (ता. रायबाग) येथील भगवान इंग्लिश मीडियम स्कूलची सृष्टी पत्तार, एकसंबा येथील मोरारजी निवासी शाळेचा विद्यार्थी शंभू खनै, भोज (ता. निपाणी) येथील न्यू सेकंडरी स्कूलची वर्षा पाटील, अथणी येथील विद्यावर्धक इंग्लिश मीडियम स्कूलचा विवेकानंद होन्नाळी यांनीही पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.