वार्ताहर /बैलहोंगल
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा डोंगराला सोमवारी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यल्लम्मा डोंगरावर मी काही मुख्यमंत्री म्हणून आलो नाही. मी यल्लम्मा देवीचा सामान्य भक्त म्हणून आलो असून याच देवीच्या भक्तीने आम्हाला उच्चस्तरीय पद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी बसवराज जिरगाळ, बैलहोंगलचे प्रांताधिकारी शशीधर बगली, सौंदत्ती तहसीलदार जी. बी. चिक्कनगौडर, देवस्थान व्यवस्थापन समितीचे बसय्या हिरेमठ, देवस्थानचे अधीक्षक अरविंद माळगे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. देवस्थानचे कर्मचारी व पुजारीवर्ग उपस्थित होता.