Tarun Bharat

परत एकदा देशात मोदीजींना काम करण्याची संधी मिळावी- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

श्री क्षेत्र औदुंबर प्रतिपादन

भिलवडी/ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाची धुरा सक्षमपणे संभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोव्यात उत्तम कामगिरी करत आहोत.गोवा राज्यासाठी चांगली सुस्थिती निर्माण व्हावी व त्यांना देशाचे नेतृत्व जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी व परत एकदा देशात मोदीजींना काम करण्याची संधी मिळावी असे साकडे श्री दत्त गुरू चरणी घातले असल्याचे मत व्यक्त केले.

ते औदुंबर ता. पलुस येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दर्शनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख प्रमुख उपस्थित होते. दत्त मंदीरात मुख्यमंत्री यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मंदीर व्यवस्थापनाच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला.

दर्शनानंतर मुख्यमंत्री यांनी अंकलखोप येथील भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Related Stories

सांगली : कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

Archana Banage

कर्मवीर भाऊराव पाटील यांना सांगलीत अभिवादन

Archana Banage

सांगली : विठ्ठलापुरातील ९६ वर्षीय वृध्देला कोरोनाची लागण

Archana Banage

निलेश काब्रालांचा अखिल भारतीय वकील मंचाकडून निषेध

Patil_p

संपतराव पवार ‘महाराष्ट्र जल सन्मान’ पुरस्काराने सन्मानित

Kalyani Amanagi

बेकायदा गाडय़ावर कारवाईकडे मडगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष

Patil_p