Tarun Bharat

गोवा सहकारी बँकेला अडीच लाखांचा दंड

Advertisements

बँक नियमन कायद्याचे पालन न केल्याचा ठपका

प्रतिनिधी /पणजी

बँक नियमन कायद्यातील तत्वांचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गोवा राज्य सहकारी बँकेला रु. 2.51 लाखांचा दंड केला आहे. त्याबाबतचा आदेश आरबीआयने जारी केला आहे.

बँक नियमन कायदा 1949 च्या विभाग 56 कलम 9 चे सदर बँकेने पालन केले नाही. सदर कारवाई नियमन कायद्यांतर्गत असून बँकेचे व्यवहार किंवा कराराबाबत कोणताही प्रश्न त्यातून निर्माण होत नाही, असा खुलासा आरबीआयने केला आहे.

या प्रकरणी आरबीआयतर्फे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर बँकेतर्फे उत्तरही देण्यात आले होते आणि आरबीआयने सुनावणी देखील घेतली होती. परंतु त्यातून आरबीआयचे समाधान झाले नाही. बँकेला मर्यादित स्वरुपाचा कालावधी देण्यात आला होता. त्या मुदतीत बँकेने काहीच केले नसल्याचा ठपका आरबीआयने ठेवला आहे. बँकेने त्या कामासाठी मुदतवाढ मागितली होती आणि ती देण्यात आली होती. परंतु त्या कलमाचे पालन करण्यास बँक अपयशी ठरल्याचे आरबीआयने आदेशात म्हटले आहे.

गोव्यातील अनेक बँक विविध विषयांमुळे आरबीआयच्या नजरेखाली आल्या असून आता आरबीआयने गोवा राज्य सहकारी बॅंकेलाही दंडात्मक कारवाईचा दणका दिला आहे.

Related Stories

‘रूपशा नोदीर बांके’ सैनिकावर आधारित चित्रपट

Amit Kulkarni

वारंवार बारगळणाऱया अविश्वास ठरावांचे सत्तानाटय़

Patil_p

‘फास्टॅग’ही होणार कालबाह्य

Amit Kulkarni

आजपासून रोज कामावर या

Omkar B

लोकोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे ध्येय

Amit Kulkarni

देवाबाग येथे पार्क केलेल्या बुलेटला आग दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!