प्रतिनिधी /पणजी
गोवा डेअरीच्या येत्या दि. 19 जून रोजी होणाऱया निवडणुकीबाबतचा निवाडा आज बुधवारी उच्च न्यायालयात होणार आहे. काल मंगळवारी या विषयावर पुन्हा सुनावणी झाली असता न्यायमूर्तीनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यावर 15 रोजी निवाडा देण्याचे स्पष्ट पेले. 19 जून रोजीच्या निवडणुकीबाबत अद्याप सस्पेन्स कायम असून आज कोणता निवाडा होतोय याकडे राज्यातील सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱयांचे लक्ष लागून आहे.