सहकार निबंधकाने दरवाढ मान्य केल्यास परिस्थिती सुधारेल : परराज्यातील दुध संकलनाचा दर परवडेना,हायफॅटचे दर 57 वरून होणार 62 रूपये प्रतिलीटर
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या हाय फॅट दुध पिशव्याची सद्या बाजारात सर्वत्र टंचाई भासू लागली आहे. जोपर्यत दुधदरवाढीचा प्रस्ताव सहकार निबंधकाकडू मंजूर होत नाही तोपर्यंत हाय फॅट दुधावर अवलंबून राहणाऱयांना कळ सोसण्यावाचून पर्यांय नसल्याची परिस्थती उद्भवलेली आहे.
गोवा डेअरीच्या हाय फॅट दुध पिशव्या मागील दहा दिवसापासून बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे गोवा डेअरीच्या दुधावर अवलंबून राहणाऱयांनी अमूल व इतर ब्रॅन्डच्या हायफॅट दुधाचा पर्याय स्वीकारण्यास सुरूवात केली असून गोवा डेअरीच्या दुधविक्रीवरही परिणाम जाणवू लागला आहे. दिवसाकाठी गोवा डेअरीच्या सुमारे 8000 लिटर हायफॅट दुधाला बाजरात मागणी आहे. यासंबंधी गोवा डेअरीचे ओएसडी म्हणून कार्यरत असलेल्या व्यवस्थापकीय संचालक काशी नाईक यांनी परराज्यातील दुधाच्या किमती गगनाला भिडलेल्या असून राज्यातील दुधाची आवक कमी झाल्यामुळे सदर परिस्थिती झालेली असल्याचे सांगितले.
गोवा डेअरीने दुध दरवाढीचा प्रस्तावावर अजून सहकार खात्याने मान्यता दिलेली नाही. वाढत्या महंगाईमुळे परराज्यातून दुध घेणे न परवडण्य़ासारखे झालेले आहे. याला काहीअंशी जबाबदार पुर्वी कार्यरत असलेले मंडळ आहे. दुधपुरवठा जास्त होता त्यावेळी परराज्यातील ठेकेदाराकडून दुध घेताना वर्षभरासाठी करार करणे जरूरीचे होते. जेणेकरून त्यावेळचा दर आजही अबाधित राहिला असता ऐनवेळी मागणी वाढली व दुध संकलनही कमी झाल्यामुळे परराज्यातील शेतकऱयांनी दूध दर वाढविलेला आहे.आजच्या घडीला त्याचा परिणाम हायफॅट दुधाचा कमतरतेत होऊ लागला आहे. दिवसाकाठी 8 हजार लिटर हायफॅट दुधाचा पुरवठा करणारी गोवा डेअरी हतबल ठरत आहे.
गोवा डेअरीला तिहेरी फटका
गोवा डेअरीची 65000 लिटर दुधविक्रि घटून 58000 लिटर प्रतिदिन अशी घसरण झालेली आहे. पशुखाद्य प्रकल्पातही तोटा जाणवत असून दुध उत्पादकांना देऊ केलेली रू 2 प्रति लिटर वाढ असा तिहेरी फटका डेअरीला बसलेला आहे. त्यामुळे सहकार खात्याने याप्रकरणी त्वरीत लक्ष घालून दुध दरवाढीची फाईल हातावेगळी करून दिलासा द्यावा. सद्या गोवा डेअरीच्या निवडणूक प्रक्रियाच्या हालचाली वेग घेत असून एकूण 173 सोसायटय़ाचे अध्यक्ष निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी करीत आहेत तर सहकार खाते निवडणूकीच्या जय्यत तयारीला लागले आहे. दरम्यान येत्या बुधवारी 27 एप्रिल रोजी गोवा डेअरीची आमसभा घेण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक काशी नाईक यांनी दिली.
सहकार खात्यातून दरवाढीसाठी ग्रीन सिग्नल
वाढती महंगाई, वाहतूक दरात वाढ, कच्चा मालात झालेल्या दरवाढीमूळे गोवा डेअरीला प्रचंड नुकसानी सोसावी लागत असल्यामुळे ग्राहकांसाठी प्रति लिटर रू. 4 दुधदरवाढीचा निर्णय त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीने घेतला होता. या दरवाढीतून होणाऱया नफ्यातून दुध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रूपयांनी वाढ करण्यात येणार आहे. याचा फायदा सुमारे 178 दुध सोसायटीच्या माध्यमातून जोडलेल्या राज्यातील सुमारे साडे चार हजार दुध उत्पादकांना मिळणार आहे. दुध दरवाढीतून डेअरीला सुमारे 1 लाख 20 हजार रूपये नफा दिवसाकाठी होणार असल्याची माहिती काशी नाईक यांनी दिली. सहकार निबंधकाकडे याप्रकरणी फाईल मंजूरीसाठी पाठविण्यात आलेली आहे. गोवा डेअरीतर्फे चार घटकातून दुध विक्री सद्यस्थितीत होत आहे. हाय फॅट फुल क्रिम दुध सद्या 57 रूपये प्रति लिटर असा असून तो वाढवून नव्या दरानुसार 62 रूपये प्रति लिटर असा दर ग्राहकांना सोसावा लागणार आहे. अर्धा लिटरमध्ये उपलब्ध असलेली शक्ती स्टेंन्डर्ड मिल्क रू. 25 वरून 27 रूपये, दिवा गायीचे दुध रू. 23 वरून रू. 25, कोल्ड गोल्ड रू. 22 ऐवजी रू.24 तसेच 20 रूपये असलेली 450 मिलीलिटरची पिशवीवर रू.22 ग्राहकांना खरेदी लागणार आहे.