Tarun Bharat

गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त

Advertisements

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाची कारवाई : 6 लाख 67 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या आलिशान कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने सापळा रचून कारवाई केली.या कारवाईत 2लाख रुपये किमतीची दारू व स्विफ्ट कार(एमएच07क्यू8685)असा एकूण 6 लाख 67 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर विनापरवाना बेकायदा दारू वाहतूक केल्या प्रकरणी चालक श्रीकृष्ण सुभाष कदम (वय32रा.अणाव, हुमरमळा, ता.कुडाळ)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई चराठा येथे सायंकाळी उशिरा करण्यात आली.सलग दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याने अवैध दारू वाहतूक दारांचे धाबे दणाणले आहेत. मा . विभागीय उपायुक्त बी एच तडवी यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कुडाळचे निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक डी एम वायदंडे , जवान मयुरी चव्हाण, वाहन चालक एच आर वस्त यांनी केली.

Related Stories

जिल्हय़ातील शाळा आता पूर्णवेळ

NIKHIL_N

कोरोना टेस्ट सेंटरची जागा काही ठरेना…

Ganeshprasad Gogate

विमान प्रवासाचे रत्नागिरीकरांचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबध्द!

Patil_p

परिचारीकेवर बलात्कार करणाऱया नराधमाला अटक

Patil_p

गोव्यातून दोडामार्गात येणाऱ्या कदंबा बसेस अचानक बंद

NIKHIL_N

सिव्हीलची ‘कायाकल्प’ची हॅटट्रीक!

Patil_p
error: Content is protected !!