मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : नाताळनिमित्त पर्रा येथे स्टार स्पर्धेला उपस्थिती,राज्याची पर्यटन ओळख कायम राखण्यासाठी झटुया
प्रतिनिधी /म्हापसा
गोवा राज्याला त्रास देऊन राज्याचे नाव बदनाम करणारे पर्यटक आम्हाला राज्यात नको आहेत. दिवसेंदिवस राज्यात नवनवीन येणाऱया पर्यटकांना आम्ही प्रोत्साहन देऊ. 2023 चे गोवा राज्यात स्वागत करीत असताना गोवा राज्य हे भारत देशातील पर्यटन क्षेत्रच नव्हे तर जगाची पर्यटन राजधानी आहे, हा संदेश जगाला देऊया. हा संदेश देत असताना आमच्या राज्याचे पर्यटन क्षेत्र कायमस्वरुपी सांभाळून ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित झटूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रा येथे बोलताना केले.
पर्रा सिटीझन फोरम आयोजित नाताळाच्या आठव्या गोवा स्टार स्पर्धेवेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो, सरपंच चंदानंद हरमलकर, उपसरपंच डॅनिअल लोबो, आमदार केदार नाईक आदी सरपंच, पंच, बाबू भट आदी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
निसर्ग सवंधर्नासाठी पुढाकार घ्या!
नाताळ हा सण प्रेमाचा आणि शांततेचा. जेझू ख्रिश्ताचा जन्म प्रेम आणि शांतीकाय देशासाठी झाला. आणि त्यांनी शांती आणि प्रेम जगातील सर्व लोकांसाठी संदेश दिला. हे एकमेव गोवा राज्य आहे जेथे जातीमध्ये भांडणे होताना पहायला मिळत नाही आणि यापुढेही मिळणार नाही. याची खबरदारी सर्वांनी आम्ही घ्यायला पाहिजे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन बांधव सणाला एकमेकांच्या घरी जातो व सण साजरे करतो. विशेषतः चतुर्थी, दिवाळी आणि नाताळ हे तिन्ही सण सर्व धर्मासाठी मोठे सण असून ते उत्साहात साजरे केले जातात. या उत्साहाच्या वातावरणात निसर्ग सवंर्धनाची जबाबदारी फक्त आमचीच नव्हे तर सर्व नागरिकांची आहे. निसर्ग राखण्यासाठी आम्ही सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे, आमची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
पुढील 50 वर्षांसाठी पायाभूत सुविधा तयार आहेत
गोवा राज्य हे विकसित राज्य आहे. मोपा विमानतळ झेप घेत आहे. नवीन इस्पितळ आणि जुवारी पूल पूर्णत्वाकडे आला आहे. राज्याला पायाभूत सुविधा पाहिजे त्या पूर्णत्वास आल्या आहेत. पुढील 50 वर्षांचे पायाभूत सुविधा आम्ही येथे उभी करून पूर्णत्वास आणली आहे. डबल इंजिनच्या सरकारने ते आताच पूर्ण केले आहे. पुढील 50 वर्षे हा पर्यटक असाच रहायला पाहिजे तर आमची ती जबाबदारी आहे. खाण बंद करण्यास काही शक्ती देशापलीकडून राज्यात वावरत होते. त्यामुळे खाण बंद झाल्याने राज्याची परिस्थिती कशी बिकट झाली, हे आम्ही गेली 10 वर्षे पाहिले आहे. त्या धर्तीवर राज्यातील पर्यटक कमी व्हावे म्हणून काही शक्ती वावरत आहेत. त्या शक्तीच्या विरोधात आम्हाला पुढे यावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यटकांचे राज्यात स्वागत करूया!
राज्यात दिवसेंदिवस चांगले पर्यटक येतात, त्यांचे आम्ही उत्साहात स्वागत करणे आवश्यक आहे. 2023 चे गोव्यात स्वागत करीत असताना संपूर्ण जगाचा आम्ही संदेश देऊया. गोवा राज्य हे भारत देशातील पर्यटन क्षेत्रच नव्हे तर देशातील पर्यटकांची राजधानी आहे ती आम्ही सांभाळून ठेवण्यासाठी झटूया असे मुख्यमंत्री म्हणाले.
काही शक्ती पर्यटन व्यवसायाच्या विरोधात!
खाण व्यवसाय बंद झाल्याने राज्याची आर्थिक स्थिती गेल्या 10 वर्षात कशी बिकट झाली हे सर्वांनी पाहिले आहे. जसे खाण व्यवसाय बंद करण्यास काही शक्ती देशापलीकडून राज्यात वावरत होते. त्याच धर्तीवर राज्यातील पर्यटक कमी व्हावे म्हणून काही शक्ती राज्यात वावरत आहे. त्या शक्तीच्या विरोधात आम्हाला आता पुढे यावे लागेल, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप मोरजकर यांनी केले तर आभार आमदार डिलायला लोबो यांनी मानले.