Tarun Bharat

म्हापसात अपघात, बेळगावचे ३ युवक ठार

गोवा-म्हापसा : प्रतिनिधी

म्हापसामधील कुचेली येथे आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण ठार झाले आहेत. ठार झालेले तिघे युवक बेळगावचे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी जीएमसी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावचे काही युवक हे कामानिमित्त गोवा राज्यात गेले होते. ते म्हापसामधील कुचेली जवळ असताना आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या वाहनांची धडक झाडाला बसली. ही धडक इतकी जोराची होती की, वाहनातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. या कारच्या भीषण अपघातात बेळगावातील नायर अंगोलकर (वय 28 वर्षे), रोहन गडग (वय 26 वर्षे) आणि सनी अन्वेकर (वय 31 वर्षे) हे ३ तरुण ठार झाले आहेत. घटनास्थळी, तर कारमधील चौथा प्रवासी विशाल कारेकर (वय २७ वर्षे) गंभीर जखमी झाला आहे. जखमी विशालला उपचारासाठी जीएसएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

पुण्यातील वीजयंत्रणेला ‘निसर्ग’चा धक्का, जिल्हा अंधारात

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 67,752 रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

मिरजेत घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून

Abhijeet Shinde

गोव्यात कोळसा ‘हब’ होऊ दिला जाणार नाही

Patil_p

सातारा : अंभेरीत कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला 9 वर

Abhijeet Shinde

सामाजिक कार्यकर्त्यांची पोलिसांसाठी पाणी सेवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!