Tarun Bharat

तीस वर्षांत गोवा गाठणार अक्षय उर्जा प्राप्तीचे ध्येय

Advertisements

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा विश्वास

प्रतिनिधी /पणजी

पुढील 30 वर्षात म्हणजेच 2050 पर्यंत गोवा 100 टक्के अक्षय उर्जा प्राप्त करण्याचे ध्येय साध्य करेल, असा विश्वास वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे.

नवीन आणि अक्षय उर्जा खात्यातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. 100 टक्के अक्षय उर्जा प्राप्त करण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने दिशा निर्देश ठरविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सरकारने जीआयझेड या जर्मन संस्थेशी सामंजस्य केले असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. हायड्रोजन आणि सौर उर्जा या दोन्ही पर्यायांवर या कार्यशाळेत सखोल चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेत बोलताना अक्षय उर्जा संचालक आलेक्स डिकॉस्टा यांनी, अक्षय उर्जा प्राप्तीचे ध्येय साध्य करण्यात लोकांचाही सहभाग असावा यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि माहिती देण्याच्या उद्देशाने गोवा उर्जा विकास संस्थेतर्फे (गेडा) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या उद्देशपूर्तीसाठी केंद्र सरकारने अनेक राज्यांची नावे प्रस्तावित केली असून त्यात गोव्याचाही समावेश असल्याचेही डिकॉस्टा यांनी पुढे सांगितले.

Related Stories

पुरातन झरीच्या बाजूला प्रकल्पास परवानगी दिल्याने आसगावातील ग्रामस्थ आक्रमक

Amit Kulkarni

वादळी वाऱयामुळे केळी बागायतीची नुकसानी

Amit Kulkarni

वास्कोत सर्वधर्मीय शांती समिती निवडणार

Omkar B

अपघातात जखमी झालेल्या कदंब कंडक्टरला मृत्यू

Omkar B

खाण पट्ट्या शेतकर्‍यांन समोर अनेक प्रश्न

GAURESH SATTARKAR

काँग्रेस महिला मोर्चाकडून डीजीपीना निवेदन

Patil_p
error: Content is protected !!