Tarun Bharat

गोव्याला ड्रग्ज डेस्टिनेशन होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

भजन-कीर्तन ही गोव्याची संस्कृती आहे, ड्रग्ज नव्हे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

अमलीपदार्थांच्या व्यवहाराविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल. ड्रग्ज ही गोव्याची संस्कृती नाही, ‘भजन’ व ‘कीर्तन’ ही आपली संस्कृती आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. ड्रग्ज व्यवहार तसेच बेकायदेशीर कामांसाठी वापरल्या जाणाऱया कोणत्याही ठिकाणावर यापुढे बुलडोझर फिरवला जाईल आणि या बेकायदेशीर कामात गुंतलेल्या लोकांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गोवा हे ’ड्रग डेस्टिनेशन’ नव्हे

चालू हंगामात गोवा हे ‘ड्रग्ज डेस्टिनेशन’ नव्हे, असा संदेश द्यायचा आहे. गोवा चांगल्या पर्यटकांसाठी आहे. नाईटक्लब असो वा पार्टी डेस्टिनेशनमध्ये कुणीही अमलीपदार्थांचे सेवन करताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. आम्ही गोव्यात ड्रग्ज खपवून घेणार नाही, असाही इशारा डॉ. सावंत यांनी दिला.

अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एएनसी सर्व विभागांशी समन्वय साधून प्रभावीपणे काम करत आहे. मुख्यमंत्री या नात्याने त्यासंदर्भात आपण राज्य प्रशासन आणि पोलिसांच्या वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. राज्यातील नार्कोटिक सेल अधिक बळकट करण्याचे निर्देशही दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.

Related Stories

मांद्रे पंचायतीत औट घटकेच्या खुर्चीचा खेळ

Amit Kulkarni

कार्यकर्त्यांमधून आलेल्या नावांतूनच उमेदवार निवडू

Amit Kulkarni

पर्वरीत 7.40 लाखांचे हशिश जप्त

Amit Kulkarni

सिद्धीचा बुडून मृत्यू नव्हे तर तिचा घातपातच !

Patil_p

गॅरेंजमालकही खाणी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत

Patil_p

पेडणेत उषा नागवेकर यांचा घरोघरी प्रचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!