Tarun Bharat

हिमालयातील मोटरस्पोर्ट इव्हेंटमध्ये गोव्याचा अमूल विजेता

पाच वेळा कार तुटून देखील ठरला विजेता

प्रतिनिधी /मडगाव

वास्को येथील अमूल अनिल सातोस्कर याने चार दिवसीय एक्सट्रीम मोटरस्पोर्ट इव्हेंट ‘रॅली ऑफ हिमालय’मध्ये विजेतेपद पटकावले. भव्य हिमालयावरील त्याचा हा चौथा विजय. अमूल अनिल सातोस्कर यांची मित्सुबिशी सेडिया ही कार चार दिवस चाललेल्या ‘रॅली ऑफ हिमालया’ या एक्सट्रीम मोटरस्पोर्ट इव्हेंटमध्ये पाच वेळा तुटून पडली होती, पण त्यामुळे त्यांची ‘कधीही हार मानू नका’ ही भावना खचली नाही आणि त्याने 11 मिनिटांच्या मोठय़ा फरकाने कार श्रेणीमध्ये पहिले विजेतेपद पटकावले.

या चॅम्पयिनशिपमध्ये सहभागी झालेला तो एकमेव गोमंतकीय होता. व्यावसायिक रॅलीमध्ये टीम गोव्याचे प्रतिनिधित्व केले. 22 वर्षांच्या कारकिर्दीत, सातोस्कर यांनी देशातील प्रत्येक मोठय़ा रॅलीमध्ये भाग घेतला आणि सलग उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. याआधी, त्याने ‘रेड दे हिमालया’ साठी सूव प्रकारात सलग तीन वर्षे जिंकली होती आणि जरी हिमालयातील हवामान गोव्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असले तरीही त्याने रेंजमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रॅलीमध्ये ते धैर्याने पार केले.

‘मी टीम गोवा या नावाने गोव्याचे प्रतिनिधित्व करतो, तरीही मला आतापर्यंत राज्य सरकारचा पाठिंबा मिळालेला नाही. रॅलीच्या काही दिवस आधी मी मनालीला गेलो जेणेकरून मला उंचावर जाण्याची सवय होईल. यावषी हा मार्ग मनाली, सोलांग व्हॅली, रोहतांग, ग्रांपू, केलाँग, पटसिओ, जिस्पा, बरलाचा शिंकुला असा होता. हा संपूर्ण मार्ग एकूण 823 किलोमीटर व्यापतो. काळा बर्फ, मातीचे दगड आणि 11 वॉटर क्रॉसिंग यांसारख्या वेगवेगळय़ा भूप्रदेशांसह स्पर्धेसाठी दररोज तीन आव्हाने होती. जी मी कधीही विसरणार नाही कारण माझी कार कमी ग्राउंड क्लीयरन्समुळे पाच वेळा बंद झाली. हा सर्वात कठीण भूभाग होता कारण तो कारसाठी नाही, कार स्पर्धेच्यावेळी कायम स्वरूपी बंद पडली नाही हा मोठा दिलासा होता असे अमूल सातोस्कर म्हणाले.

कारची आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगताना ते म्हणाले,  कार बंगळुरूहून भाडय़ाने घेतली होती आणि ट्रकवर ती मनालीला पाठवण्यात आली होती. दुर्दैवाने, मोठय़ा भूस्खलनामुळे, ट्रक चंदिगडमध्ये अडकला आणि मालकाला तो मनालीला न्यावा लागला. ‘आयोजकांच्या छाननी चाचणीच्या अर्धा तास आधी कार पोहोचली. गोव्याकडे सरावासाठी कोणतेही रेस ट्रक नाहीत. कार पार्क करण्याआधी मी कारमध्ये फक्त काही फेऱया मारल्या होत्या, जिथे ती शर्यतीपर्यंत सील केली जाते.

ते पुढे म्हणाले की, ‘कार स्पर्धेतील इतर कारच्या तुलनेत जुनी होती आणि तितकी शक्तिशाली नव्हती आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त जोखीम पत्करू शकलो नाही आणि माझ्या कारला पूर्ण क्षमेतत चालवू शकलो नाही. परिणामी उच्च उंचीवर माझा वेग राखू शकलो नाही. 3-अंश तापमानात माझा सर्वोच्च वेग 142 किमी / तास होता. गोठवणारी थंडी होती आणि आम्ही पहाटे 4 वाजता रॅलीला सुरुवात करायचो आणि संपूर्ण डेटा शेडय़ूल संपवून आव्हाने पूर्ण करायचो, संध्याकाळपर्यंत मला पूर्णपणे थकल्यासारखे वाटायचे. तरीही, माझी टीम आणि मी अजूनही प्रथम स्थान मिळवण्यात यशस्वी झालो. मी माझा नॅव्हिगेटर, बेंगळुरूचा रवी कुमार, माझा टनर, बेंगळुरूचा इम्रान खान आणि माझा तांत्रिक प्रमुख, सम्राट यादव आणि त्याच्या दिल्लीच्या टीमचा खूप आभारी आहे.

एफएमएससीआयच्या संयुक्त विद्यमाने एक्सट्रीम मोटरस्पोर्ट्स क्लबने 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान या रॅलीचे आयोजन केले होते. मोटरस्पोर्ट्स हा जगातील सर्वात महागडय़ा खेळांपैकी एक आहे आणि आतापर्यंत सातोस्कर यांनी आपल्या रिअल इस्टेट व्यवसायाने आपली आवड जिवंत ठेवली आहे. ते टीम टाटा, टीम महिंद्रा आणि टीम मारुती सुझुकी साठी रेड दे हिमालया साठी व्यावसायिक रॅली ड्रायव्हर आहेत आणि मुंबईत रतन टाटा टीम फुल थ्रॉटलने त्यांचा सत्कार केला होता. तो रॅली आर्ट बंगलोर, आयएनआरसी रॅली, डेझर्ट स्टॉर्म रॅली आणि दक्षिण डेअर रॅली यांसारख्या राष्ट्रीय रॅलींमध्ये विजेता ठरला आहे.

Related Stories

फेब्रुवारीत गोव्याचे जीएसटी संकलन 493 कोटी रुपये

Amit Kulkarni

पोलीस, सरकारच्या दुर्लक्षामुळे जनतेत असंतोष

Patil_p

चित्रापूर मठाच्या ‘अरण्य कुटीर’चे कुंडईत उद्घाटन

Omkar B

एकत्रितपणे गणेश विसर्जनाची परंपरा आजही कायम

Amit Kulkarni

टेलरिंग व्यवसाय पूर्वपदावर येतोय…

Amit Kulkarni

मनमोहनसिंग यांच्यावरील आरोप भाजपने सिद्ध करावेत

Amit Kulkarni