मंत्री रोहन खंवटे यांची माहिती : अ.भा. पर्यटन परिषदेस लावली उपस्थिती
प्रतिनिधी / म्हापसा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा राज्य पर्यटनदृष्टय़ा उंच शिखरापर्यंत नेण्याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहोत. तसेच राज्यात ‘होम स्टे’ यावर पर्यटनदृष्टय़ा भर देऊन अधिकाधिक पर्यटक कसे येईल याकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या अखिल भारतीय पर्यटन परिषदेत भाग घेऊन आल्यानंतर म्हापसा येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. राज्य सध्या अमली पदार्थ विषयी बदनाम होत असले तरी आम्ही पर्यटनदृष्टय़ा राज्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहुया. मुख्यमंत्री ड्रग्सबाबत गंभीर आहेत शिवाय गैरकृत्यांवर कारवाई होत असताना पत्रकारांनी सकारात्मक बातम्या द्याव्यात. नाहक राज्याचे नाव बदनाम नको असे पर्यटन मंत्री म्हणाले.
विविध देशातील मंत्र्याचा सहभाग
अखिल भारतीय पर्यटन परिषद घर मशाले हिमाचल प्रदेश येथे पार पडली. गोव्याचे प्रतिनिधीत्व करताना गोव्यातील विविध समस्या मांडल्या. सलग तीन दिवस ही परिषद होती. त्याठिकाणी केंद्रीय मंत्री श्री. रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गृहमंत्री अजय भटजी आदी मंत्रीगण उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या विविध चर्चेत देशातील विविध मंत्र्यांनी सहभाग घेतला. सर्वांना यावेळी वेगवेगळे अनुभव व येणारी आव्हाने याबाबत चर्चा करण्यास लावली, असे खंवटे यांनी सांगितले.
मोपामुळे राज्याचे चित्र बदलणार
आम्ही सनसीटच्या खाली सॉफ्टवेअर जोडून घेतले. कोविड काळात त्याचा आम्हाला बराच फायदा झाला. या दरम्यान लोकांनी आपल्या घरातून काम करण्यास सुरुवात केली. त्याचा आम्हाला आर्थिकदृष्टय़ा फायदा झाल्या. आम्ही इंटरलँड पर्यटक कसे गावोगावी जावे व त्यातून होम स्टे बाबत भर दिला. आता मोपा येथे विमानतळही होत असून तो पूर्णतः सुरू झाल्यावर राज्याचे चित्र आम्हाला वेगळय़ा प्रकारे पहायला मिळणार आहे.
पर्यटकांची रेलचेल राज्यात वाढू लागली
राज्यात पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. त्या माध्यमातून पर्यटकांना आम्हाला सुविधा द्याव्या लागत आहेत. गोव्यात फक्त सेंड सन व सी या पुरतेच न राहता इनडोनेशन पर्यटक, एडव्हेंचर पर्यटक, व्हेलनेस टय़ुरिझम, अशा पर्यटकांना एकत्रित कसे आणता येईल यावर राज्य सरकार भर देणार आहे. आम्हाला तेथे विमान वाहतूक मंत्र्यांकडे चर्चा करण्याची संधी मिळाली. मोपामध्ये जागा कशी वाढवता येईल याबाबतही चर्चा झाली. यासाठी आम्हाला पुन्हा दिल्लीत बोलावण्यात आल्याची माहिती खंवटे यांनी आली.
केंद्रातून राज्याला सर्व ते सहकार्य
‘इ व्हिजा’चा प्रश्न काय आहे याबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवावा लागेल. एअरलाईन्स तिकीट कशा वाढविता येतील याकडे लक्ष देण्यात येईल. केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला राज्यासाठी सर्व परीने सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. स्वदेश दर्शन, प्रदेश दर्शन योजना आम्हाला सांगण्यात आल्या.
गोवा सुरक्षित असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी
मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ड्रग्सचा विषय हाती घेतला आहे. ‘से नो टू ड्रग्स’ आम्ही प्रश्न प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो. मग ते ड्रग्स असू द्या, गैरकृत्य असू द्या वा मसाज पार्लर वेश्या व्यवसाय, गाईड बाबत सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून येणाऱया काळात अशावर कारवाई होईल. याचप्रमाणे पत्रकारांनी सकारात्मक दृष्टय़ा लिखाण करून गोवा हा सर्वांसाठी सुरक्षित असल्याची माहिती सर्वत्र पोचवावी असे आवाहन मंत्र्यांनी यावेळी केले. देशभरातच नव्हे तो आंतरराष्ट्रीय सुद्धा याची माहिती मिळायला पाहिजे की गोवा सर्वांसाठी सुरक्षित आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे असे मंत्री म्हणाले.
जेटीला विरोध करणाऱयांशी समोरासमोर बोलण्यास तयार
कळंगूट ग्रामसभेत जेटी आणण्यास विरोध दर्शविला आहे याबाबत पर्यटन मंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, विरोध करायला पाहिजे म्हणून विरोध नको. जेटी धोरण अद्याप अमलात आणले नाही. कळंगूट रापणकार असो वा अन्य कुणी ते धोरण सर्वांसाठी चर्चेस खुले ठेवलेले आहे. आपण यावर चर्चा करण्यास तयार आहे असे मंत्री खंवटे म्हणाले.