रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न : गावोगावी लसीकरण मोहिमेला प्रारंभ : पशुपालकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांना लम्पिस्कीन या विषाणू संसर्गाची लागण होत आहे. आतापर्यंत तालुक्मयातील 117 हून अधिक जनावरांना लागण झाली असून सात जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. यासाठी तालुक्मयात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. लम्पिस्कीन नियंत्रणात आणण्यासाठी ‘गोट फॉक्स’ लसीकरण केले जात आहे.
तालुक्मयातील पूर्व भागामध्ये या रोगाची लागण अधिक प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी रोग आटोक्मयात येत असला तरी दुसरीकडे प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. जनावरांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयुक्त ठरणारी गोट फॉक्स ही लस दिली जात आहे. इतकेच नव्हे तर योग्य पद्धतीने औषधोपचार करून जनावरांना बरेदेखील केले जात आहे. लागण झालेल्या जनावरांपैकी बरे झालेल्या जनावरांची संख्या अधिक असल्याने पशुसंगोपनसाठी ही समाधानकारक बाब आहे. दरम्यान बाधित क्षेत्रातील सर्व जनावरांचे वेगाने लसीकरण व पशुपालकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय जनावरांचे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
रोगाचा अटकाव करण्यासाठी पशुसंगोपनने रॅपिड ऍक्शन पथकाची नियुक्ती केली आहे. या माध्यमातून बाधित जनावरांच्या गोठय़ात तात्काळ उपचार दिले जात आहेत. जनावराच्या अंगावर गाठी येणे, रक्तस्त्राव, अशक्तपणा, ताप, दूध क्षमता कमी होणे, अशी लक्षणे दिसून येतात. तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
रोगाचा फैलाव वाढू नये, यासाठी जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. एपीएमसी, हिरेबागेवाडी येथील जनावरांचे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. शिवाय जिल्हय़ातील ज्या ठिकाणी लम्पिस्कीनची जनावरे आढळून आली आहेत, त्या ठिकाणीदेखील जनावरांचे बाजार बंद ठेवले जाणार आहेत.
आंतर जिल्हा पशू वाहतुकीवर प्रतिबंध
जिल्हय़ात ठिकठिकाणी लम्पिस्कीनची लागण झालेली जनावरे आढळून येत आहेत. शिवाय महाराष्ट्रातदेखील या रोगाने थैमान माजविले आहे. त्यामुळे आंतरराज्य आणि आंतर जिल्हा पशू वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे एका राज्यातून दुसऱया राज्यात आणि एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात जनावरांची वाहतूक करता येणार नाही.
शर्यतीवर निर्बंध
लम्पिस्कीनची लक्षणे गाय आणि बैल जनावरामध्ये अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे शर्यतींच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. लम्पिस्कीन आटोक्मयात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गावोगावी फवारणी
लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी गावोगावी प्रतिबंधात्मक फवारणी करण्याच्या सूचना संबंधित ग्राम पंचायतींना देण्यात आल्या आहेत. तालुक्मयात केवळ पूर्व भागात लम्पिस्कीन आढळून आला तरी सर्वच गावांमध्ये खबरदारी म्हणून फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱयांनी घाबरू नये
तालुक्मयात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना गोट फॉक्स लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. शेतकऱयांनी घाबरू नये, जनावरांमध्ये ताप, चारा न खाणे अशी लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधावा. लसीकरण सुरू असल्याने लागण झालेली जनावरे बरी होतील.
– डॉ. आनंद पाटील ( तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)