Tarun Bharat

बकरी मंडईत लाखेंची उलाढाल

बकरी ईदसाठी मोठी खरेदी

प्रतिनिधी/ बेळगाव

बकरी ईदनिमित्त शनिवारी बेळगाव येथील बकरी मंडई येथे लाखो रुपयांची उलाढाल झाली. केवळ बेळगावच नव्हे तर रामदुर्ग, गोकाक, चिकोडी, हुबळी, मिरज या परिसरातून शेकडो बकरी दाखल झाली होती. 5 हजारांपासून 35 ते 40 हजारांपर्यंत बकऱयांवर बोली लावण्यात आली. त्यामुळे बऱयाच दिवसांनंतर बकरी मंडईमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली.

बकरी ईददिवशी मुस्लीम समाजाकडून मटण व बकऱयांना मोठी मागणी असते. रविवारी बकरी ईद साजरा होणार असल्याने या पार्श्वभूमीवर शनिवारी बकरी मंडई येथे बकऱयांचा मोठा बाजार भरला होता. शेळी व पालवे यांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली होती. विपेत्यांबरोबरच खरेदीदारांची मोठी गर्दी मंडईमध्ये दिसून आली.

लहान बकरी 5 हजार तर वजनानुसार 20 ते 25 हजारांपर्यंत बोली लावण्यात येत होती. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावषी मोठय़ा प्रमाणात बकऱयांची आवक झाल्याचे विपेत्यांकडून सांगण्यात येत होते. डोक्मयावर चाँद असलेल्या बकऱयांना मोठी बोली लावून खरेदी करण्यात येते होते.

Related Stories

राष्ट्रीय मास्टर्स ऍथलेटीक्स स्पर्धेत धेंडीराम शिंदे, सुरेश देवरमनी यांचे सुयश

Amit Kulkarni

एल ऍण्ड टी कंपनीला आली गळती निवारणाची जाग

Omkar B

शानभाग-भंडारी शाळेतर्फे सायकल फेरी

Amit Kulkarni

अन्… व्यापाऱयांनी केले रस्त्यावरील खड्डय़ात वृक्षारोपण

Patil_p

संगीताने दिला वृद्धांना आनंद

Patil_p

आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा

Patil_p