Tarun Bharat

बकरी चोरीप्रकरणाचा पोलिसांकडून छडा

खानापुरातील युवकाला टेम्पोसह अटक : साथीदार फरार

प्रतिनिधी /बेळगाव

पंधरा दिवसांपूर्वी हलकी (ता. सौंदत्ती) क्रॉसजवळ तीस बकऱयांची चोरी केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात मुरगोड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खानापूर येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून चोरीसाठी वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी पत्रकाद्वारे रविवारी ही माहिती दिली. अशोक बसाप्पा माडमगेरी (वय 26) रा. खानापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हलकी क्रॉसजवळ 1 सप्टेंबर रोजी रात्री एका मेंढपाळाने शेतात बसविलेल्या 30 बकऱया चोरल्या होत्या.

या प्रकरणी मुरगोड पोलिसात एफआयआर दाखल केला होता. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली, लक्ष्मी बिरादार व त्यांच्या सहकाऱयांनी अशोकला अटक करून या चोरीचा छडा लावला.

चोरलेल्या बकऱयांची एक लाख रुपयांना विक्री केली होती. ते एक लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरीसाठी वापरलेली 2 लाख 15 हजार किमतीची टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी फरारी असून पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

दहावी पुरवणी परीक्षेचे मूल्यमापन पूर्ण

Omkar B

कंग्राळी बुद्रुकमधील शर्यतीत जाफरवाडीची बैलगाडी प्रथम

Amit Kulkarni

यंदाच्या गणेशोत्सवाला कडक नियमांचे मखर

Tousif Mujawar

‘त्या’ बारा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Amit Kulkarni

सीबीटी बसस्थानकाच्या कामाला गती

Amit Kulkarni

न्यू नवहिंद सोसायटीच्या नंदगड शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

Patil_p