Tarun Bharat

गोडोली तळय़ाच्या संवर्धनाचे काम लवकरच

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयाच्या पूर्व भागाची शान म्हणून गोडोली तळे ओळखले जाते. याच गोडोली तळय़ाच्या संवर्धनासाठी आता नगरोत्थानमधून तब्बल चार कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हे सकारात्मक काम आणण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम आता येत्या काही दिवसात सुरु होईल. दरम्यान, या तळय़ाभोवती वॉकिंग ट्रक, सेल्फी पॉईंट, मेडिटेशन हॉल, ऍम्पीथिएटर आणि कारंजे आदी सुविधा असणार आहेत. त्यामुळे हे तळे म्हणजे सातारकरांसाठी प्रेक्षणीय ठरणार आहे.

  साताऱयाच्या पूर्व भागात राजवाडा येथे सांयकाळी सातारकरांना फिरण्यासाठी चौपाटी आणि बाग आहे. त्यात आता मंगळवार तळय़ातील कारंजे लक्ष वेधून घेतात. गोल बागेतले कारंजे पहात ज्येष्ठ नागरिक आपला वेळ घालवतात. परंतु याच्याच उलट परिस्थती पूर्व भागात आहे. पूर्व भागात दोन तीन गार्डन आहेत. तरी सुद्धा गोडोली भागात नागरिकांना खास असे ठिकाण नव्हते. आता मात्र ते ठिकाण पहायला मिळणार आहे. गोडोली तळय़ाचा समावेश अमृत सरोवर म्हणून झालेला आहे. त्या योजनेतून वैशिष्टय़पूर्ण योजनेतून तब्बल 4 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्या अमृत सरोवर योजनेतून तळयाला नवीन झळाळी मिळणार आहे. सध्या असलेले तळे पहाता. तळय़ाच्या पश्चिम बाजूला सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्याच्याच जवळ कचरा टाकला जातो. पलिकडच्या बाजूला पूर्वेंला कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे तळय़ाला अवकळा आल्याचे चित्र पहायला मिळते. पावसाळय़ात पावसाचे पाणी अडण्याची भीती असते. परंतु आलेल्या निधीतून या तळय़ाचे रुपडे पालटणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वॉकिंग ट्रक असणार आहे. हा वॉकिंग ट्रक साताऱयात प्रथमच खास करुन होणार आहे. तळय़ाच्या आतमध्ये पाण्यात वॉकिंग ट्रक असणार आहे. तेथेच सेल्फी पॉईंट काढण्यात येणार आहे. मेडिटेशन हॉल, ऍम्पीथिएटर असणार आहे. विशेष म्हणजे कारंजे मनमोहून घेणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात गोडोली तळे हा टकाटक पॉईंट म्हणून नावारुपाला येणार हे निश्चित.

  मुख्याधिकारी बापट साहेब है तो…!

सकारात्मक दृष्टीकोनातून काम करणारा अधिकारी असला की विकासात्मक कामांना वेग येतो. त्याचेच उदाहरण सध्याच्या गोडोली तळय़ाच्या बाबतीत पहायला मिळते. गोडोली तळय़ाचा समावेश अमृत सरोवरात करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा प्रशासन म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केला. त्यामुळे चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 25 टक्के केंद्र शासनाकडून, 50 टक्के राज्य शासनाकडून आणि 25 टक्के नगरपालिका असा सहभाग असणार आहे.

सातारचे वैभव गोडोली तळे

गोडोली तळे हे पर्यटकांची आवडते केंद्र येत्या काळात बनणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या तळय़ावर जे सातारकर फिरायला येतील त्यांचे मन येथे रमणार आहे. सेल्फी काढण्याचा मोह होणार आहे. पर्यटकांची मन प्रफुल्लीत करेल असे गोडोली तळे होणार आहे.

शेखर मोरे पाटील

Related Stories

महाबळेश्वर : मारहाणप्रकरणी घोडेवाल्यांना अटक

datta jadhav

सातारा पालिकेला स्वच्छ भारत अभियानाचे वावडे

Archana Banage

कोडोलीचे तीन भागात विभाजन : बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी

Archana Banage

यंदाही संतांची एसटीनेच पंढरीची आषाढी वारी

Archana Banage

पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांच्या रांगेत शरद पवारांनी बसू नये

Abhijeet Khandekar

राज ठाकरेंनी कधी बालवाडी चालवली नाही

Rahul Gadkar