Tarun Bharat

गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

Advertisements

शनिवार-रविवारसह सुटीच्या दिवशी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी : परिवहन महामंडळाकडून विशेष बसची सुविधा

प्रतिनिधी /बेळगाव

मागील चार दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धबधबे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. परिणामी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. गोकाक येथील धबधबादेखील पुन्हा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. विशेषतः शनिवार-रविवारी आणि सुटीच्या दिवशी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे.

बेळगावपासून जवळ असलेल्या गोकाक, गोडचिनमलकी धबधब्यांसाठी परिवहनने विशेष बस सुरू केली आहे. शिवाय स्वतःची वाहने घेऊनदेखील धबधब्याकडे जाणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर वाढविल्याने धबधब्यात पाणी वाढले आहे. उंचावरून वाहत येऊन फेसाळणारे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शिवाय तरुण-तरुणी नयनरम्य दृश्याची सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

शौचालयांचा अभाव

गोकाक आणि गोडचिनमलकी या ठिकाणी शौचालय नसल्याने जाणाऱया पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांची कुचंबणा होताना दिसत आहे. दरवषी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून पर्यटक दाखल होत असतात. मात्र, या ठिकाणी शौचालय नसल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हुल्लडबाज पर्यटकांमुळे झुलता पूल बंद

गोकाक धबधब्याला भेट देणाऱया पर्यटकांमध्ये तरुण-तरुणींचा अधिक समावेश आहे. दरम्यान, अनेक तरुण येथील झुलत्या पुलावर स्टंटबाजी करणे, विनाकारण पूल हलविणे यामुळे इतर पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांमुळे झुलता पूल बंद ठेवला आहे.

मद्यधुंद पर्यटकांमुळे अस्वच्छता

गोकाक, गोडचिनमलकी या ठिकाणी भेट देणारे तरुण अधिकतर मद्यधुंद अवस्थेत असतात. दरम्यान, दारू ढोसून बॉटल आणि इतर साहित्य त्याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी अस्वच्छता पसरलेली दिसते. शिवाय बॉटलदेखील फोडल्या जातात. त्यामुळे इतर पर्यटकांच्या पायांना लागून जखमा होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून पर्यटकांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

कणकुंबीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त

Patil_p

कर्नाटक सीईटी: ५७ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी परीक्षेस उपस्थित

Abhijeet Shinde

मतदारयादी सर्वेक्षणाचे काम लवकरच

Patil_p

बालविवाह रोखण्यासाठी ‘सुरक्षिणी’ वेबपोर्टल

Amit Kulkarni

पुन्हा पावसाचा जोर

Amit Kulkarni

आशा कार्यकर्त्यांची समुदाय आरोग्य केंद्रासमोर निदर्शने

Patil_p
error: Content is protected !!